आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Nana Patole's Spin From Thackeray's MLAs? VIDEO MLA Nitesh Rane Said, This Is The Time.. To 'close The Rest Of The Shop'

दावा:ठाकरेंच्या आमदारांकडून नाना पटोले यांची फिरकी? VIDEO आमदार नितेश राणे म्हणाले, हीच ती वेळ.. 'उरलेले दुकान बंद करण्याची'

3 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यातील सत्ता संघर्षाच्या नाट्यमय घडामोडीनंतर सर्वोच्च न्यायालयाने 16 आमदारांच्या पात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्षांकडे सोपवला आहे. या संदर्भात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शिष्टमंडळाने विधानसभा अध्यक्ष यांची भेट घेतली. यावेळी त्यांच्यात झालेल्या चर्चेचा एक व्हिडिओ भाजपा आमदार नितेश राणे यांनी सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये उद्धव ठाकरे यांच्या सेनेतील नेते काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची फिरकी घेत असल्याचा दावा नितेश राणे यांनी केला आहे.

यासंदर्भात त्यांनी एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे नेते अनिल परब आणि विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे हे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची फिरकी घेत असल्याचे दिसत आहे.

काय म्हणाले नितेश राणे

'काल हा video mute करुन दाखवा असे channels ना सांगितले गेले.. उध्दव ठाकरेंचे शिल्लक आमदार नाना पटोलेंची फिरकी घेत आहेत.. किती serious आहेत case बद्दल.. किती ती निष्ठा उध्दवजींवर !!! हिच ती वेळ..उरलेल दुकान बंद करण्याची !'

16 आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्द्यावर घेतली होती भेट

16 आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्द्यावर लवकरात लवकर निर्णय घ्यावा, या मागणीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शिष्टमंडळाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची त्यांच्या दालनात भेट घेतली होती. 16 आमदारांच्या अपात्रतेचा लवकरात लवकर निर्णय घ्यावा या मागणीचे निवेदन शिष्टमंडळाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना दिले. याआधी विधानसभेचे गटनेते अजय चौधरी आणि प्रतोद सुनील प्रभू यांनी उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांना पत्र दिले होते. शिष्टमंडळात विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, आमदार अनिल परब, शिवसेना ठाकरे पक्षाचे गटनेते अजय चौधरी, आमदार विलास पोतनीस, आमदार रवींद्र वायकर, आमदार रमेश कोरगावकर उपस्थित होते.