आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपरोधित प्रतिक्रिया:शिवसेना हे आमचे जुने प्रेम, 'व्हॅलेंटाईन डे'ची भेट म्हणून 'त्या' सात नगरसेवकांना पाठवले; नितेश राणे

रायगड2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मूळ शिवसेनेकडे उमेदवार नाहीत म्हणून हे 7 जण दिले, उद्धव ठाकरेंनी त्यांचा स्वीकार करावा : नितेश राणे

शिवसेना हे आमचे जुने प्रेम आहे. व्हॅलेंटाईन डे च्या निमित्ताने हे सात नगरसेवक मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठवले आहेत. आमच्या मेडिकल कॉलेजच्या फाईलवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सही केली. याबाबत आम्ही त्यांना पुष्पगुच्छ जरी पाठवला तरी ते आमच्याकडून घेणार नाहीत. मात्र त्यांना एक भेट म्हणून हे नगरसेवक त्यांच्याकडे पाठवत आहे. त्यांनी त्यांचा स्वीकार करावा. अशा उपरोधित शब्दात वाभावें - वैभववाडी नगरपंचायतीच्या नगरसेवकांनी भाजपाचा दिलेल्या राजीनाम्यावर आमदार नितेश राणे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. तसे ट्विटही त्यांनी केले आहे.

मूळ शिवसेनेकडे उमेदवार नाहीत म्हणून हे ७ जण दिले

वाभावें - वैभववाडी नगरपंचायतीच्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये मूळ शिवसेनेने जवळ उमेदवार मिळत नाहीत अशी तेथे शिवसेनेची आज परिस्थिती आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाची अशी अवस्था होऊ नये. अशी बाळासाहेबांवर प्रेम करणारे निष्ठावान कुटुंबीय म्हणून आमची भावना असल्याचा टोला आमदार नितेश राणे यांनी लगावला. व्हॅलेंटाईन डे च्या निमित्ताने हे सात नगरसेवक मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठवले आहेत. असेही ते म्हणाले आहेत.

आम्ही उद्धव ठाकरेंना काही देऊ शकत नाही व आम्ही दिले तर ते घेणार नाहीत

वैभववाडी मधील त्या ७ नगरसेवकांच्या शिवसेना पक्ष प्रवेशाच्या अनुषंगाने नितेश राणे पुढे म्हणाले, व्हॅलेंटाईन डे च्या निमित्ताने हे सात नगरसेवक मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठवले आहेत. आमच्या मेडिकल कॉलेजच्या रूटीन फाईल वर सही करण्यासाठी माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेना जेव्हा फोन केला होता तेव्हा उद्धव ठाकरे यांनी सकारात्मक प्रतिसाद देत आमच्या मेडिकल कॉलेजच्या रुटीन फाईलवर त्यांनी सही केली. आम्ही उद्धव ठाकरेंना काही देऊ शकत नाही व आम्ही दिले तर ते घेणार नाहीत. त्यामुळे उद्धव ठाकरे यांचे आभार मानण्यासाठी हे सात नगरसेवक मी त्यांच्याकडे पाठवत आहे. त्याचा त्यांनी स्वीकार करावा. व्हॅलेंटाइन डेच्या निमित्ताने मी शिवसेना व उद्धव ठाकरेंना शुभेच्छा देतो असा उपरोधिक टोला नितेश राणे यांनी लगावला.