आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'प्रगती का हायवे':महाराष्ट्रातील महामार्गांसंदर्भात नितीन गडकरींनी केली महत्त्वाची घोषणा, कोट्यावधींचा निधी होणार खर्च

नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
 • कॉपी लिंक
 • प्रगती का हायवे हा हॅशटॅग करत त्यांनी राज्यातील वेगवेगळ्या रस्त्यांची कामसाठी निधी मंजूर करण्यात आला असल्याचे जाहीर केले

केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरींनी आज राज्यातील अनेक राष्ट्रीय आणि राज्य महामार्गांच्या कामांविषयी महत्त्वाची घोषणा केली आहे. या कामांसाठी कोट्यावधींचा निधी जाहीर करण्यात आला असल्याचे त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगितले आहे. यामध्ये महाराष्ट्रातील विविध रस्तेकामांसाठी जवळपास 2780 कोटींची घोषणा करण्यात आली आहे.

नितीन गडकरींनी गुरुवारी राज्यातील महत्त्वाच्या महामार्गांच्या कामांविषयी सोशल मीडियावर माहिती दिली. प्रगती का हायवे हा हॅशटॅग करत त्यांनी राज्यातील वेगवेगळ्या रस्त्यांची कामसाठी निधी मंजूर करण्यात आला असल्याचे जाहीर केले. यामध्ये विशेषतः कोकणातील रस्त्यांचा समावेश आहे.

नितीन गडकरींनी केलेल्या महत्त्वाच्या घोषणा

 • जळगाव-मनमाड राष्ट्रीय महामार्ग 753 जे च्या विस्तारीकरणासाठी 252 कोटी रुपये मंजूर करण्यात आहे आहे. हा रस्ता दोन पदरी किंवा चार पदरी केला जाणार आहे.
 • राष्ट्रीय महामार्ग 752 आयवरील वातूर ते चारथाना दरम्यान असलेल्या रस्ते कामासाठी 228 कोटी रुपये खर्च केले जाणार.
 • गडचिरोली तालुक्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग 353 सीवरील 262 किमी ते 321 किमीच्या अंतरामध्ये 16 लहान मोठे पूल बांधले जातील. यासाठी 282 कोटी रुपयांचा निधी यासाठी मंजूर करण्यात आला आहे.
 • तारीरी- गगनबावडा – कोल्हापूर या राष्ट्रीय महारमार्ग 166 जीवरील रस्ते कामासाठी 167 कोटी रुपये निधी मंजूर.
 • तिरोरा ते गोंदियादरम्यानच्या राष्ट्रीय महामार्ग 753 च्या दोन पदरी रस्त्याचे बांधकाम केले जाईल. यासाठी 282 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत.
 • नागपुरातील आरटीओ चौक ते नागपूर विद्यापीठ कॅम्पस असा उड्डाणपूल बांधला जाईल. यासोबतच राष्ट्रीय महामार्ग 53 वर वाडी/एमआयडीसी जंक्शन येथे चार पदरी उड्डाण पूल बांधण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. यासाठी एकूण 478 कोटी 83 लाखांचा निधी मंजूर.
 • राष्ट्रीय महामार्ग 361 एफच्या परळी गंगाखेडदरम्यानच्या कामासाठी 222 कोटी 44 लाख रुपये मंजूर.
 • तिरोरा गोंदियादरम्यानच्या राज्य महामार्गाच्या कामासाठी 288.13 कोटी रुपये मंजूर, तर राष्ट्रीय महामार्ग 753 अंतर्गत 28.2 किमीचा नवीन रस्त्यांचे बांधकाम केले जाईल.
 • नांदेड जिल्ह्यातील येसगी गावामध्ये मांजरा नदीवर पूल बांधण्यात येणार आहे. यासाठी 188 कोटी 69 लाख रुपये मंजूर केले आहेत. हा पूल राष्ट्रीय महामार्ग 63 चा भाग असणार आहे.
 • आमगाव गोंदियादरम्यानच्या राष्ट्रीय महामार्ग 543 साठी 239 कोटी 24 लाख रुपयांचा निधी मंजूर.
बातम्या आणखी आहेत...