आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यसभेचे विश्लेषण:काही मोठा प्रलय वगैरे आलेला नाही, दिवसा तारे पाहू नका; प्रफुल्ल पटेलांची जोरदार टोलेबाजी

मुंबई18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यसभा निवडणुकीच्या निकालानंतर काही मोठा प्रलय वगैरे आलेला नाही. सगळे लोक आम्हाला सोडून गेलेत, असे काहीही झालेले नाही. काही जणांची छोट्या-मोठ्या कामांसाठी नाराजी असू शकते. मात्र, यावरून सरकारला धोका वगैरे आहे, हे दिवसा तारे पाहण्यासारखे आहे. या निकालावर दोन-चार दिवसांत प्रमुख मंडळी बसून चिंतन करू, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्यसभेचे नवनिर्वाचित खासदार प्रफुल्ल पटेल यांनी दिली. ते मुंबईत बोलत होते.

काही लोकांची प्रवृत्ती वेगळी...

प्रफुल्ल पटेल म्हणाले की, प्रश्न एवढाच की काही अपक्षांची मते आणि जास्ती नाहीत तर चार-पाच मते मिळाली नाहीत. दुसरी गोष्ट. आमचे एक मत अवैध ठरले. नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांना मतासाठी जामीन मिळाला नाही. या तिन्ही गोष्टींचा विचार केला, तर फार मोठा फटका नाही. अपक्षांमध्ये काही लोकांची वेगळी प्रवृत्ती. काही लोकांची क्षणिक छोट्यामोठ्या कामांसाठी नाराजी असू शकते. तिन्ही पक्षांनी व्यवस्थित मतदान केले.

ज्येष्ठांची मते पवारांना...

प्रफुल्ल पटेल म्हणाले, आमच्याकडे ५१ मतदान होते. आमच्या पक्षाने ४२ मते घ्यायचे ठरवले होते. मात्र, मला ४३ मते कसे मिळाली, हे पाहावे लागेल. एखादा प्रेम करणारा असू शकतो. माझी उर्वरित ९ मते संजय पवारांना दिली. त्यातही सर्व ज्येष्ठ मंत्री होते. अजित दादा, भुजबळ, मुंडे, भुजबळ मुंडे, टोपे, हसन मुश्रिफ. त्याचे कारण म्हणजे आम्हाला ४२ मते मिळाली. मतदान केल्यानंतर नियमानुसार आमच्या प्रतिनिधीला दाखवावी लागते. त्यामुळे आमच्या ज्येष्ठ मंत्र्यांची मते पवारांना ट्रान्सफर केली. संजय राऊतांना ही ४२ मते मिळाली. कांदे यांचे एक मत अवैध ठरले.

कुठेही फटका नाही...

प्रफुल्ल पटेल म्हणाले, जसा काही मोठा प्रलय आलेला आहे, सगळे लोक आम्हाला सोडून गेलेले आहेत, असे काहीही झालेले नाही. भारतीय जनता पक्षाचा एक माणूस निवडून आलाय. याचे विश्लेषण होईल. सकाळी चारपर्यंत मतदान सुरू होते. सगळ्या बाबचे तपशील होऊ शकले नाहीत. दोन-चार दिवसांत प्रमुख मंडळी बसून चिंतन करतील. आमचे जे काही ५१ अधिकृत मते होती, ती व्यवस्थित मिळाली. त्यात कुठेही फटका बसलेला नाही. या निवडणुकीत अजित पवार असो की, जयंत पाटील असो आमच्या लोकांनी मित्रपक्षांसह साऱ्यांची छोटी-मोठी नाराजी दूर करण्यासाठी प्रयत्न केले. इतर आमदारांना भेटून व्यवस्थित मुख्यमंत्री महोदयांसाठी गाठ घालून दिली. विजयी होण्यासाठी प्रयत्न केले.

नागपूरमध्ये काय चाललेय?

प्रफुल्ल पटेल म्हणाले, राज्यसभेसाठी दाखविल्याशिवाय मतदान करता येत नाही. गडबड केली, तर कारवाई होऊ शकते. त्यामुळे व्यवस्थित माणसे बसवली. त्यामुळे कोण फुटले याच्या तपशीलात जाता येईल. बघा मी आरोप-प्रत्यारोपाच्या भानगडीत पडणार नाही. फक्त मी चुकीचे काय हे सांगितले. थोडाफार कामाबद्दल काही आमदारांनी छोटी मोठी नाराजी व्यक्त केली असेल, पण स्वाभाविक आहे. महाविकास आघाडीत तीन पक्ष आहेत. अपक्ष आमदार आहेत. त्यात थोडा वेळ लागतो. एक सरकारच्या पक्षात काही नाराजीचे सूर असतात. नागपूरमध्ये एका पक्षात काय चालले हे सांगाची गरज आहे काय, असा सवालही त्यांनी केला.

बातम्या आणखी आहेत...