आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

प्रतिक्रिया:'कितीही मोठी ऑफर आली तरी एकनाथ खडसे भाजप सोडून दुसऱ्या पक्षात जाणार नाहीत'- सुधीर मुनगंटीवार

मुंबई8 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो - Divya Marathi
फाइल फोटो
  • 'खडसेंचे काम एका विचारासाठी आहे'

काही दिवसांपासून भाजपचा उत्तर महाराष्ट्रातील बडा नेता पक्षाला सोडचिठ्ठी देणार आणि तो नेता म्हणजे, एकनाथ खडसे आहे, अशा चर्चा रंगू लागल्या आहेत. परंतू, या चर्चांवर भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 'एकनाथ खडसेंना दुसऱ्या पक्षाने कितीही मोठी ऑफर दिली, तरी ते भाजप सोडून दुसऱ्या पक्षात जाणार नाहीत,'असे सुधीर मुनगंटीवार यांनी एका वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे.

यावेळी मुनगंटीवार म्हणाले की, 'मी 1980 पासून भाजपचा कार्यकर्ता म्हणून काम करत आहे. एकनाथ खडसे आमचे ज्येष्ठ नेते आहे. त्यांच्याशी अनेकदा बैठकीत आणि प्रत्यक्ष संपर्क आला. त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील पैलू मी समजून घेतले आहेत. काही घटनांबद्दल मनामध्ये दु:ख असू शकते. पण कार्यकर्ता म्हणून एक विश्वास आहे की खडसे भाजप सोडून दुसऱ्या पक्षात जाणार नाहीत. दुसऱ्या पक्षाने कितीही मोठी ऑफर दिली, तरीही खडसेंचा डीएनए त्यांना दुसऱ्या पक्षात जाऊ देत नाही.'

'कधी कधी रागाच्या भरात, मला विचार करावा लागेल, असे म्हणतात. पण मी तुम्हाला खात्रीने सांगतो की, ते जेव्हा शांतपणे बसतात तेव्हा त्यांच्या मनात पुन्हा तोच विचार येत असेल की, हा पक्ष सोडून जायचे नाही. खडसेंचे काम हे विचारासाठी आहेत ते व्यक्तीसाठी काम करत नाहीत. खडसेंना खूप ऑफर आल्या पण त्यांनी पक्ष सोडला नाही. त्यांची व्यक्तीशी श्रद्धा नाही विचाराशी आहे. आमच्या आधी त्यांनी पक्षासाठी भरपूर काही केलं आहे. त्यांच्या त्यागाचा सन्मान आहे. त्यांना मी विनंती करेन की असे विचार मनात आणू नका. खडसे योद्धा आहेत. त्यांनी ऑपरेशन झाल्यानंतरीही जनसेवा थांबवली नाही. हा पक्ष नाही परिवार आहे. त्यामुळे ते परिवाराचे सदस्य आहे,' असेही सुधीर मुनगंटीवार यावेळी म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...