आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

स्पष्टीकरण:शरद पवार आणि अमित शहा यांची कोणतीही भेट नाही, ही अफवा आहे - नवाब मलिक

मुंबई25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • काही गोष्टी सार्वजनिक केल्या जात नाहीत- अमित शहा

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार व प्रफुल पटेल यांची अहमदाबाद येथे अमित शहा यांच्यासोबत कोणतीही भेट झाली नाही ही अफवा पसरवून संभ्रम निर्माण करण्यात आला आहे अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली.

गेले दोन दिवस ट्वीटरवर बातम्या पसरवण्यात आल्या आणि दिव्यभास्करमध्ये लहान बातमी करुन चॅनेलवर बातम्या दाखवायला सुरुवात करण्यात आल्या. एका पत्रकाराकडून प्रश्न विचारुन संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न स्वतः अमित शहा यांनी केला आहे असा आरोप नवाब मलिक यांनी केला आहे.

ज्या बातम्या पसरवण्यात आल्या त्या खोट्या आहेत. कोणतीही भेट झालेली नाही. आणि भेटण्याचा उद्देश किंवा कारण असू शकत नाही असेही नवाब मलिक यांनी स्पष्ट केले.

काही गोष्टी सार्वजनिक केल्या जात नाहीत- अमित शहा

महाराष्ट्रात अँटिलिया प्रकरणावरुन राजकारण चांगलेच तापलेले आहे. यातच, महाविकास आघाडी सरकारमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या गुजरात यात्रेने सर्वांनाच धक्का बसला आहे. दिव्य भास्करने दिलेल्या वृत्तानुसार, शरद पवार आणि प्रफुल्ल पटेल यांनी अहमदाबादमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली आहे. शहा आणि पवार यांच्या भेटीमुळे महाराष्ट्रातील सरकारला धोक्याची घंटा असल्याचे म्हटले जात आहे. दरम्यान, रविवारी पत्रकार परिषदेत याबाबत प्रश्न विचारला असता, अमित शहा म्हणाले की, काही गोष्टी सार्वजनिक करता येत नाहीत. शहा यांच्या या विधानाचे सध्या चर्चा सुरू आहे.

बातम्या आणखी आहेत...