आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अभिनंदन मुलाखत:'त्यांना कुणी गांभीर्याने घेत नाही, त्यांची लायकी काय आहे ?' उद्धव ठाकरेंचा चंद्रकांत पाटलांवर घणाघात

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 'असल्या लोकांबद्दल मला काही बोलायचे नाही'

महाविकास आघाडी सरकारच्या वर्षपूर्ती निमित्त उद्धव ठाकरेंनी सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांना मुलाखत दिली. मुलाखतीदरम्यान भाजप नते चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर केलेल्या विधानावर मुख्यमंत्र्यांनी पाटलांवर निशाना साधला.

मुलाखतीदरम्यान संजय राऊत म्हणाले की, 'शरद पवार हे देशातले, राज्यातले एक प्रमुख नेते आहेत. प्रदीर्घ काळ त्यांचा अनुभव आहे. पण, भाजपचे काही लोक त्यांना अत्यंत कमी उंचीचे नेते म्हणाले. त्यांची कुवत नाही, ते लोकनेतेच नाहीत, असे म्हणाले.' संजय राऊत यांनी केलेल्या प्रश्नावर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, 'जाऊ द्या हो…असल्या प्रतिक्रिया देणाऱ्या लोकांच्याबद्दल मला काही बोलायचीसुद्धा गरज वाटत नाही. त्यांना कुणी गांभीर्याने घेत नाही. बोलणाऱ्यांची लायकी काय आहे ? कोणीही काहीही बोलेल आणि काहीही ऐकायचं? कशाला वेळ घालवतायेत त्यात!,' असे म्हणत उद्धव ठाकरेंनी पाटील यांच्यावर निशाणा साधला.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser