आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Now A Government Scheme In The Name Of Aditya Thackeray; Vehicle Training Will Be Imparted To Backward Class Youth

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

योजना:आता आदित्य ठाकरेंच्या नावानेही सरकारी योजना; मागासवर्गीय युवकांना दिले जाणार वाहन प्रशिक्षण

औरंगाबाद23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • यासाठी ३० लाख रुपयांची अंदाजपत्रकात तरतूद केली आहे

सरकार बदलले की जुन्याच याेजनांत बदल करून नवीन नावांनी त्याची अंमलबजावणी केली जाते. अापल्या पक्षासाठी अादर्श असलेल्यांची नावे या याेजनांना दिली जातात. त्याच अाधारे महाविकास अाघाडी सरकारनेही बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने स्मार्ट कृषी याेजना व शरद पवार यांच्या नावाने ग्रामसमृद्धी याेजना जाहीर केली. या लाेकांचे विविध क्षेत्रात उल्लेखनीय याेगदानही असते. मात्र अाैरंगाबाद जिल्हा परिषदेने मात्र अवघे ३१ वर्षे वयाेमान असलेले व मंत्रिपदाचा उणापुरा एका वर्षाचाच अनुभव असलेले शिवसेनेचे नेते अादित्य ठाकरे यांच्या नावाने एक याेजना जाहीर करण्याचा ‘विक्रम’ केला अाहे.

आैरंगाबाद जिल्ह्यातील ग्रामीण भागात अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, भटक्या व विमुक्त जातीमधील मागासवर्गीय युवकांना चारचाकी वाहनचालक परवाना प्रशिक्षण मिळावे व त्यांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी या हेतूने जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण समितीने एक याेजना सर्वसाधारण सभेत सादर केली. त्याला ‘आदित्य ठाकरे युवा चारचाकी वाहनचालक परवाना प्रशिक्षण योजना’ असे नावही देण्यात अाले. यासाठी ३० लाख रुपयांची अंदाजपत्रकात तरतूद केली अाहे.

या योजनेअंतर्गत मागासवर्गीय युवकांनी चारचाकी वाहनचालक परवाना काढण्यासाठी लागणारे शुल्क व एका महिन्याचा निवासी भत्ता यासाठी अनुदान दिले जाणार अाहे. किमान दहावी नापास किंवा त्यापेक्षा अधिक शैक्षणिक अर्हतेचे उमेदवार यासाठी पात्र ठरणार अाहेत.

अादित्य हे अायडाॅल

अादित्य ठाकरे हे तरुणांचे प्रतिनिधी असून सरकारमधील अायडाॅल अाहेत. म्हणूनच युवकांसाठी सुरू केलेल्या याेजनेस त्यांचे नाव देण्याचा निर्णय घेतला. - मोनाली राठोड, समाजकल्याण सभापती

बातम्या आणखी आहेत...