आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:आता कानांना बुरशी व बॅक्टेरियाचा संसर्ग; कान दुखणे, कमी ऐकू येणे, पाणी येण्यासारखे प्रकार वाढले

पुणेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • ओलाव्यामुळे बुरशीजन्य संसर्ग

महामारीचा काळ सुरू असतानाच अाता कानांना बुरशीजन्य आणि बॅक्टेरिया संसर्गाच्या तक्रारी वाढल्या अाहेत. कानाचा संसर्ग टाळण्यासाठी, आपले कान स्वच्छ व कोरडे ठेवा आणि कानाचे दुखणे, ऐकायला कमी येणे, कानातून पाणी येणे यासारख्या गोष्टींकडे लक्ष दुर्लक्ष करू नका, अशी माहिती पुण्यातील अपोलो स्पेक्ट्रा हॉस्पिटलच्या कान, नाक, घसा तज्ञ डॉ. पुर्वा लुनावत यांनी दिली.

लुनावत म्हणाल्या, कानाचा संसर्ग होणे ही पावसाळ्यात होणारी एक सामान्य घटना आहे. ते कानाच्या कोणत्याही भागावर परिणाम करू शकतात कानाच्या आतील बाजू, बाहेरील भागालासुद्धा जंतू संसर्ग होऊ शकतो. पावसाचे पाणी कानात साचून राहिल्यास बुरशीजन्य संसर्ग होऊ शकतो. त्याचप्रमाणे वातावरणात वाढलेली आर्द्रता ही बॅक्टेरिया आणि बुरशीच्या वाढीसाठी कारणीभूत ठरते. शिवाय कानातील मळ आणि इअरबड्सच्या वापरामुळे झालेली किरकोळ जखम देखील कानाला संसर्ग होण्याचा धोका वाढवू शकतात. कानाचा संसर्ग झाल्यानंतर त्या व्यक्तीला सतत अस्वस्थ वाटणे, सतत कानात काही घालणे, चिडचिड होणे, खाज सुटणे, कानदुखी, ऐकण्याची क्षमता कमी होणे, कानातून पाणी येणे, चक्कर येणे, तीव्र डोकेदुखी आणि अगदी ताप यासारखे लक्षणे दिसू शकतात. मागील वर्षांच्या तुलनेत, कानात संक्रमण असलेले रुग्ण यावर्षी पाऊस सुरू होण्यापूर्वीच रुग्णालयात उपचारासाठी येत आहेत. कानाच्या संसर्गाचा उपचार म्हणजे कान स्वच्छ करणे, त्यासाठी डॉक्टरांची भेट घेऊन आवश्यक ते उपचार घेणे गरजेचे आहे. पुढे त्या म्हणाल्या की, कान स्वच्छ करण्यासाठी कानात अणकुचीदार वस्तू घालू नका. त्यामुळे संक्रमण तसेच दुखापत होऊ शकते.

ओलाव्यामुळे बुरशीजन्य संसर्ग
पुण्यातील अपोलो क्लिनिकमधील कान-नाक-घसा तज्ज्ञ डॉ. देवयानी शिंदे यांनी सांगितले की, दरवर्षी पावसाळ्यात कानात बुरशी आणि जंतुसंसर्ग होणाऱ्या रुग्णांमध्ये वाढ दिसून येते. कानामध्ये फंगल इन्फेक्शन होते. या आजारात मुख्यतः कानाला संसर्गाचा धोका अधिक असतो. पावसाळ्यात कानात ओलावा राहिल्याने बुरशीजन्य संसर्गाचा धोका वाढतो. बुरशीच्या वाढीमुळे कानदुखीचे रुग्ण उपचारासाठी येत आहेत.

बातम्या आणखी आहेत...