आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

शपथविधी:उदयनराजे भोसलेंनी शपथ घेतल्यानंतर दिली घोषणा, राज्यसभा सभापती व्यंकय्या नायडूंनी दिली समज

नवी दिल्ली3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यसभेच्या नवनिर्वाचित खासदारांनी राज्यसभा सदनात आज खासदारकीची शपथ घेतली. यामध्ये महाराष्ट्रातील सहा नेत्यांनीही खासदारकीची शपथ घेतली. यामध्ये उदयनराजे भोसले, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, रामदास आठवले, प्रियंका चतुर्वेदी, राजीव सातव आणि भागवत कराड यांनी शपथ घेतली. मात्र यामध्ये उदयनराजे भोसले यांना एका कारणामुळे सभापतींना समज द्यावी लागली.

भाजप नेते छत्रपती उदयनराजे भोसले यांनी राज्यसभेच्या खासदारकीची पहिल्यांदाच शपथ घेतली. त्यांनी इंग्रजीतून शपथ घेतली यानंतर घोषणा दिली. यामुळे उपराष्ट्रपती आणि राज्यसभा सभापती व्यंकय्या नायडू यांना उदयनराजे यांना समज द्यावी लागली. “जय हिंद जय महाराष्ट्र जय भवानी जय शिवाजी” घोषणा त्यांनी दिली होती. यावर व्यंकय्या नायडू म्हणाले की, 'सदनातील नवीन सदस्यांना सांगतो की, हे रेकॉर्डवर जाणार नाही, फक्त तुमची शपथ नोंदवली जाणार आहे. सदनात कोणतीही घोषणा देता येणार नाही, हे भविष्यात लक्षात असू द्या' अशा शब्दात व्यंकय्या नायडू यांनी उदयनराजे यांना समज दिली.

महाराष्ट्रातील 7 जणांची खासदारपदी नियुक्ती झालेली आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, काँग्रेस नेते राजीव सातव, भाजप नेते छत्रपती उदयनराजे भोसले, शिवसेना नेत्या प्रियंका चतुर्वेदी आणि भाजपच्या भागवत कराड यांनी खासदारकीची शपथ घेतली आहे. तर माजी मंत्री आणि राष्ट्रवादीच्या नेत्या फौजिया खान यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यामुळे त्या उपस्थित नव्हत्या. दरम्यान आठवले आणि उदयनराजेंनी इंग्रजी, शरद पवारांनी हिंदी, तर कराड, सातव, चतुर्वेदी यांनी मराठीतून शपथ घेतली.