आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोठी बातमी:महाराष्ट्रात ओमायक्रॉनचे 10 नवे रुग्ण सापडले, आता राज्यात एकूण 20 ओमायक्रॉन संक्रमित; आरोग्य मंत्र्यांचा दाखला देत वृत्तसंस्थेचा दावा

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्रात आज एकूण 10 ओमायक्रॉन रुग्णांची नोंद झाली आहे. सुमारे 65 स्वॅब जीनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवण्यात आले आहेत, त्यांच्या अहवालाची प्रतीक्षा आहे. आमच्याकडे जीनोम सिक्वेन्सिंगसाठी 3 लॅब आहेत, नागपूर आणि औरंगाबादमध्ये आणखी विस्तार करणार, अशी माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली. वृत्तसंस्था एएनआयने याबाबतचे ट्विट केले आहे.

मात्र, आरोग्य विभागाने जारी केलेल्या पत्रकामध्ये आतापर्यंत रुग्ण वाढीची आकडेवारी स्पष्ट केलेली नाही.

देशात आतापर्यंत या नव्या विषाणूचे 23 रुग्ण आढळून आले होते. त्यात आणखी 10 जणांची भर पडली आहे.

बातम्या आणखी आहेत...