आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • The Chief Minister Who Is Following Vaze In The Legislature Should Give A Direct Answer Now, Has The Honor Of The State Increased Now?

भाजपचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल:वाझेची विधीमंडळात पाठराखण करणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी थेट उत्तर द्यावे, राज्याचा सन्मान वाढला का?

मुंबई19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मनसुख हत्या प्रकरणात माजी पोलिस अधिकारी प्रदीप शर्मा यांचे नाव पुढे आल्यानंतर भाजपच्या नेत्यांनी शिवसेनेवर हल्ला चढवला आहे. प्रदीप शर्मा यांनी शिवसेनेच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती. आता या प्रकरणात त्यांचे नाव पुढे आले आहे, त्यामुळे विधिमंडळात वझेची पाठराखण करणाऱ्या मुख्यमंत्र्यांनीच आता थेट उत्तर दिले पाहिजे. असे म्हणत भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी मुख्यमंत्री तसेच शिवसेनेच्या नेत्यांवर निशाणा साधला आहे.

यासंदर्भात केशव उपाध्ये यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून शिवसेनेवर हल्ला चढवला आहे. ते म्हणाले की,“सचिन वाझे काही लादेन आहे का?” असा सवाल करत वाझेची विधीमंडळात पाठराखण करणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी आता थेट उत्तर दिल पाहिजे. मनसुख हिरेन यांची हत्या माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांनी केल्याची धक्कादायक माहिती एनआयएच्या प्रतिज्ञापत्रातून समोर आली आहे. सचिन वाझेप्रमाणेच प्रदीप शर्मा हेसुध्दा शिवसेनेमध्ये होते. त्यांनी निवडणूकही लढवली होती. त्यांचे शिवसेनेच्या अनेक नेत्यांसोबत घनिष्ठ संबंध होते. त्यामुळे राज्यात सत्ताधारी असलेल्या शिवसेनेशी संबंधित पोलीस अधिकाऱ्यांनी केलेला हा गुन्हा अधिकच गंभीर आहे. त्यात हिरेनची हत्या करण्यासाठी सचिन वाझेने प्रदीप शर्मा यांना ४५ लाख रुपये दिल्याचीही माहिती समोर आली आहे.'

उपाध्ये पुढे म्हणाले की, 'एका सामान्य पोलीस अधिकाऱ्याकडे एवढा पैसा आला कुठून, याचाही शोध घेतला गेला पाहिजे. तसेच हे दोघे पोलीस अधिकारी कुणाच्या इशाऱ्यावर गंभीर कृत्ये करत होते हेही समोर आलं पाहिजे. बाकी प्रत्येक गोष्टीत महाराष्ट्राचा अपमान शोधणाऱ्या शिवसेनेच्या बोलघेवड्या नेत्यांनी शिवसेनेशी संबंध असलेल्या या पोलीस अधिकाऱ्यांच्या कृतीने पोलीस खात्याचा आणि राज्याचा सन्मान वाढला का, याचं उत्तर द्यावं.'

काय आहे हे प्रकरण
प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानी 25 फेब्रुवारी 2021 रोजी स्फोटकांनी भरलेली एसयूव्ही सापडली होती. ही एसयूव्ही मनसुख हिरेन यांची होती. हिरेना यांचा मृतदेह 5 मार्च 2021 ठाण्याजवळील एका खाणीत सापडला होता. याप्रकरणी एन्काऊंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा यांना 17 जून 2019 रोजी अटक केली होती. तेव्हापासून ते न्यायालयीन कोठडीत आहे.

सबळ पुरावे असल्याचा दावा
याप्रकरणी तपास संस्था एनआयएकडे सबळ पुरावे असल्याचा दावा करण्यात आला आहे. या प्रकरणात शर्मा यांच्यावर अनेक आरोप करण्यात आले आहेत. प्रदीप शर्मा या गुन्ह्यात सक्रियपणे सहभागी होते, यामध्ये त्यांनी कट रचणे, दहशतवादी कृत्ये करणे, दहशतवादी टोळीचे सदस्य, अपहरण, खून आणि पुरावे नष्ट करणे असे गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...