आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराष्ट्रीय महामार्गावरील शहराच्या वळण रस्त्यावर त्रिकोळी पाटीवर अशोक लिलँड कंपनीचा टेम्पो भरधाव हैदराबादहून सोलापूरच्या दिशेने जात असताना गतिरोधकाचा अंदाज आला नसल्याने जागेवर पलटी होऊन गांजाची वाहतूक उघडकीस आली. या टेम्पोमध्ये अडीच किलो वजनाची ५०६ पाकिटे आढळून आली. या गांजाची अंदाजे किंमत १ कोटी २६ लाख ५० हजारांपेक्षा अधिक असल्याचे पोलिसांनी सांगितले. ही घटना शनिवारी (दि.२) दुपारी पावणेचारच्या सुमारास घडली. याप्रकरणी उमरगा पोलिसांत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.
हैदराबादहून सोलापूरच्या दिशेने भरधाव निघालेला टेम्पो (टीएस २५ टी ३९२१) राष्ट्रीय महामार्गावर शहराच्या वळण रस्त्यावर असलेल्या गतिरोधकाचा अंदाज न आल्याने दहा मीटर अंतरावर डगमगत जाऊन पलटी झाला. दरम्यान, परिसरातील नागरिकांनी ड्रायव्हर आ णि क्लिनर यांना बाहेर काढून क्रेनच्या साहाय्याने टेम्पो उभा केला असता त्यात भाजीपाल्यासोबतच गांजाची पाकिटे दिसून आली. दरम्यान, घटना घडताच अनेकांनी पाकिटाची पळवापळवी केली. सदर घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी रमेश बरकते, प्रभारी पोलिस निरीक्षक समाधान कवडे, सहायक पोलिस निरीक्षक अशोक माळी, उमरगा तहसीलदार राहुल पाटील यांच्यासह पोलिस कर्मचाऱ्यांनी स्थळ पंचनामा करून महसूल विभागाचे गजानन नरवाडे व रमेश नाईक यांच्यासमक्ष पंचनामा करण्यास सुरुवात केली. या टेम्पोत साधारणत: अडीच किलो वजनाच्या ५०६ पाकिटांमध्ये एक हजार २६५ किलो गांजा आढळून आल्याचे सांगण्यात.
गांजाची चोरून वाहतूक करण्यासाठी शक्कल
हैदराबादहून सोलापूरच्या दिशेने भरधाव जाणारा टेम्पो शहराच्या वळण रस्त्यावर त्रिकोळी मोडवर पलटी झाला. टेम्पोत खालच्या बाजूला गांजाची पाकिटे, तर त्याच्या वर विविध प्रकारचा भाजीपाला ठेवून वाहतूक करण्यात येत होती. सदरची वाहतूक तेलंगण व कर्नाटक राज्यातून होत असल्याची शक्यता आहे. गांजाची ही माहिती होऊ नये यासाठी सडणारा भाजीपाला वरती ठेवून घेऊन जाण्यामागचे कारण तपासणी केल्यास गांजा असल्याचे उघड होणार नाही. उमरगा तालुका तेलंगण, कर्नाटक सीमा भागावरील व मुंबई-हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर ठिकाण असल्याने छुप्या मार्गाने सर्रासपणे अवैध वाहतूक मोठ्या प्रमाणात होत असून पोलिस प्रशासनाने बाहेरील राज्यातून येणाऱ्या संशयास्पद वाहनांची तपासणी सुरू केली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.