आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अपघात:इंडीका पुलावरून कोसळून एक जण जागीच ठार, तर चालक गंभीर जखमी

खामगावएका वर्षापूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
मृत अजयसिंह ठाकुर - Divya Marathi
मृत अजयसिंह ठाकुर

 भरधाव जाणारी इंडीका चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे पुलावरून खाली कोसळली. या अपघातात शहरातील एका ५५ वर्षीय इसमाचा जागीच मुत्यू झाला आहे. तर चालक गंभीर जखमी झाला आहे. ही घटना काल (२७ मे) रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास अमरावती ते वडनेर दरम्यान घडली. या घटनेमुळे शहरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

शहरातील कोठारी फैल परिसरातील रहिवासी अजयसिंह रामसिंग ठाकुर (वय ५५) हे अमरावती येथे आपल्या मुलीला आण्यासाठी (एम.एच. २८/ सि/ ४९६६) या क्रमांकाच्या इंडीका कारने अमरावतीकडे जात होते. दुपारी एक वाजेच्या सुमारास वडेनर गावा जवळ येताच चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे त्यांची कार पुलावरून खाली कोसळली. या अपघातात अजयसिंह ठाकुर यांच्या डोक्याला जबर मार लागल्याने त्यांचा घटनास्थळीच मुत्यू झाला आहे. तर चालक सुरज बळीराम खाडके हा गंभीर जखमी झाला आहे. या अपघातात कार चकनाचुर झाली आहे.

अपघात घडताच नागरीकासह पोलीसांनी घटनास्थळी धाव घेवून जखमी चालकास उपचारार्थ रुग्णालयात भरती केले. तर मृतक अजयसिंग ठाकुर यांचा मुतदेह काल संध्याकाळ पर्यत शहरात आणला. त्यानंतर रात्री त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. मुतक अजयसिंग ठाकुर हे मनमिळावू स्वभावाचे होते. त्यांचे अपघाती निधन झाल्यामुळे कोठारी फैल परिसरात एकच शोककळा पसरली आहे.

बातम्या आणखी आहेत...