आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भीषण अपघात:हिंगोलीत सावरखेडा जवळ भरधाव वाहनाची दुचाकीला धडक; वडिल ठार, मुलगा गंभीर जखमी

प्रतिनिधी | हिंगोली4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिंगोली ते कळमनुरी मार्गावर पाटीजवळ भरधाव वाहनाने दुचाकीस धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीवरील वडिलांचा मृत्यू झाला तर मुलगा गंभीर जखमी झाल्याची घटना बुधवारी (ता. 2) सायंकाळी पाच वाजता घडली आहे. शंकर प्रतापराव देशमुख (४१ रा. नवखा तालुका कळमनुरी) असे मृताचे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कळमनुरी तालुक्यातील नवखा येथील शंकर प्रतापराव देशमुख व त्यांचा १४ वर्षाचा मुलगा कृष्णा शंकर देशमुख हे दोघे त्यांच्या दुचाकी वाहनावर कळमनुरी येथून सेनगाव तालुक्यातील पानकनेरगाव येथील बहिणीला भेटण्यासाठी जात होते. सायंकाळी पाच वाजता त्यांचे दुचाकी वाहन सावरखेडा शिवारात आले असताना भरधाव वाहनाने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. या अपघातामध्ये शंकर देशमुख यांचा जागीच मृत्यू झाला तर कृष्णा देशमुख गंभीर जखमी झाला. या अपघातानंतर वाहन चालकाने वाहनासह पळ काढला.

या अपघाताची माहिती मिळताच बासंबा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक राजेश मलपिल्लू , उपनिरीक्षक सुरेश भोसले, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मदन गव्हाणे, सतीश शेळके, बंडू राठोड यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी जखमी कृष्णा यास उपचारासाठी हिंगोलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले मात्र त्याची प्रकृती गंभीर असल्याने त्याला पुढील उपचारासाठी नांदेड येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

पोलिसांनी अपघातग्रस्त वाहनाचा शोध सुरू केला आहे याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत बासंबा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला नव्हता.

बातम्या आणखी आहेत...