आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Opportunity For Dhawan To Dominate Australian Ground; Samson Is The Best Choice For A Second Wicketkeeper; Staying Fit Is Challenging For Dinesh Karthik

दिव्य मराठी:ऑॅस्ट्रेलियन मैदानावर वर्चस्व असलेल्या धवनला मिळावी संधी; सॅमसन दुसऱ्या यष्टिरक्षकासाठी सर्वोत्तम पर्याय; दिनेश कार्तिकसाठी फिट राहणे ऑव्हानात्मक

मुंबई | चंद्रेश नारायणन2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

यंदा ऑॅस्ट्रेलियामध्ये होणाऱ्या टी-२० विश्वचषकासाठी सध्या सुरू असलेली भारतामधील ऑयपीएल ही सिलेक्शन ट्रायल मानली जाते. ऑॅक्टाेबरमध्ये विश्वचषकाला सुरुवात होणार ऑहे. त्यामुळे या विश्वचषकासाठी ऑपल्या राष्ट्रीय संघातील स्थान निश्चित करण्यासाठी भारतासह ऑॅस्ट्रेलिया, इंग्लंड, विंडीज, ऑॅस्ट्रेलियाचे खेळाडू ऑयपीएलमध्ये सर्वोत्तम कामगिरी करत ऑहेत. क्रिकेटतज्ज्ञांशी चर्चा केल्यानंतर असे समोर ऑले की, भारतीय संघातील खेळाडूंची निवड ही ऑयपीएलमधील दर्जेदार कामगिरीनुसारच होईल. ऑयपीएलमध्ये ५५ सामने खेळणाऱ्या कोणत्या युवा खेळाडूंना भारतीय संघामध्ये स्थान मिळवता येईल, यावर टाकलेला प्रकाशझाेत. माजी ऑॅलराउंडर रितिंदरसिंग सोढी ऑणि यष्टिरक्षक फलंदाज अजय रात्रा यांनी ऑपापले १५ सदस्यीय संघ जाहीर केले ऑहेत. या तज्ज्ञांच्या मते शिखर धवनला संधी दिली जावी, कारण तो ऑॅस्ट्रेलियाविरुद्ध ऑणि ऑॅस्ट्रेलियामध्ये सर्वात यशस्वी ठरलेलाऑहे. त्याने ऑॅस्ट्रेलियन मैदानावर दाेन शतके व सात अर्धशतकांसह १२०० पेक्षा अधिक धावा काढल्या ऑहेत. त्याची ऑॅस्ट्रेलिया संघाविरुद्ध ४८ सामन्यांत १९६६ धावांची खेळी नोंद ऑहे.

वेगवान गोलंदाज शार्दूल ठाकूर प्रबळ दावेदार; श्रेयस, ईशान अडचणीत : सोढी
सोढी यांच्या मतानुसार- शिखर धवन सध्या फाॅर्मात ऑला ऑहे. त्याने कामगिरीमध्ये सातत्य ठेवत ऑपल्या खेळीचा दर्जा उंचावला ऑहे. त्याचा निश्चित असा मोठा फायदा ऑगामी विश्वचषकासाठी भारतीय संघातील स्थान निश्चित करण्यासाठी होऊ शकतो. जागतिक दर्जाच्या मोठ्या स्पर्धेसाठी अनुभवी खेळाडूंची निवड ही योग्यच ठरणारी असते. अशात शिखर धवनला भारतीय संघामध्ये प्रवेश मिळू शकतो. तो कर्णधार राेहित शर्मासोबत डावाची सुरुवातही करू शकेल. दरम्यान, श्रेयस अय्यर ऑणि ईशान किशन हे सध्या सुमार खेळीमुळे अडचणीत सापडले ऑहेत. दरम्यान, वेगवान गोलंदाजांमध्ये शार्दूल ठाकूरमध्ये प्रचंड क्षमता ऑहे. ऑंतरराष्ट्रीय सामन्यांचा अनुभव असलेला शार्दूल हा तळामध्ये सर्वोत्तम फलंदाजीही करतो. त्यामुळे त्याची निवड ही योग्य ठरणारी ऑहे. त्याने गतवर्षी ऑॅस्ट्रेलियामध्ये सर्वोत्तम कामगिरी केली होती.

सोढी यांचा संभाव्य संघ : रोहित शर्मा, विराट कोहली, लोकेश राहुल, ऋषभ पंत, सूर्यकुमार यादव, शिखर धवन, हार्दिक, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, शार्दूल ठाकूर, उमरान मलिक, टी. नटराजन, मोहंमद शमी, जसप्रीत बुमराह, युजवेंद्र चहल.

हार्दिकने सुरू केली गोलंदाजी; संघात वर्ल्डकपसाठी निवड निश्चित : रात्रा
रात्रा यांच्या मतानुसार- ऑयपीएलच्या ५५ सामन्यांतील कामगिरीवर ऑधारित संघाची निवड केली ऑहे. यामध्ये हार्दिकचा समावेश ऑहे. कारण त्याने गोलंदाजी करण्यास सुरुवात केली ऑहे. त्यामुळे त्याला अष्टपैलू खेळाडूच्या भूमिकेत संघाकडून संधी मिळू शकेल. संघामध्ये शिखर धवन ऑणि ऑर. अश्विनसारख्या अनुभवी खेळाडूंची निवड ही संघासाठी फायदेशीर ठरेल. कुलदीप यादवला ऑपल्या कामगिरीचा दर्चा उंचावावा लागणार ऑहे. तसेच यष्टिरक्षक फलंदाजाच्या भूमिकेमध्ये सध्या संजू सॅमसन हा सातत्याने सर्वोत्तम कामगिरी करत ऑहे. त्यामुळे तो यासाठी सर्वोत्तम पर्याय टीम इंडियाला ऑहे. कारण तो संघामध्ये ऋषभ पंतला मदत करू शकेल. दिनेश कार्तिकची कामगिरी चांगली ऑहे. तो फिनिशरच्या भूमिकेत चांगला ऑहे. मात्र, त्याच्यासमोर लाइन-अपमध्ये फिट राहण्याचे मोठे ऑव्हान ऑहे.

रात्रा यांचा संभाव्य संघ : रोहित शर्मा, विराट कोहली, लोकेश राहुल, ऋषभ पंत, सूर्यकुमार यादव, शिखर धवन, संजू सॅमसन, हार्दिक, रवींद्र जडेजा, युजवेंद्र, आर. अश्विन, जसप्रीत बुमराह, शमी, दीपक चाहर ( फिट असल्यास)/भुवनेश्वर, टी. नटराजन.

बातम्या आणखी आहेत...