आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

मराठा आरक्षण:खासदार संभाजीराजे यांच्या भूमिकेला मराठा आरक्षण संघर्ष समितीचे अध्यक्ष सुरेश पाटील यांचा विरोध

साताराएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मराठा आरक्षणाच्या बाबतीत मराठा समाजातच विसंवाद असल्याचे पाहायला मिळत आहे. मराठा समाजाला आर्थिक दुर्बल घटकांत(EWS) समावेश न करण्याबाबतची खासदार संभाजीराजे यांच्या भूमिकेला मराठा आरक्षण संघर्ष समितीचे अध्यक्ष सुरेश पाटील यांनी विरोध केला आहे. साताऱ्यात ते बोलत होते.

यावेळी सुरेश पाटील म्हणाले की, संभाजीराजेंनी EWS मध्ये अनेक जाचक अटी असल्याचे सांगत मराठा समाजाला त्याअंतर्गत आरक्षण देऊ नये, अशी भूमिका मुख्यमंत्र्यांसमोर मांडली. पण आता मराठा आरक्षण संघर्ष समिती अध्यक्ष सुरेश दादा पाटील यांना संभाजीराजेंची ही भूमिका मान्य नसल्याचे म्हटले आहे. पाटील म्हणाले की, संभाजी महाराज हे राजे आहेत. ते शाहू महाराजांचे वंशज आहेत. मुख्यमंत्र्यांना भेटायला जाण्यापूर्वी सर्व संघटनांची बैठक घेऊन सर्वांची मतं घ्यायला पाहिजे होते. काही संघटनांचे ऐकून त्यांनी ही चुकीची भूमिका घेतली आहे. उदयनराजे असावेत किंवा संभाजीराजे असावेत ते मराठा आरक्षणाच्या मुद्यावर लक्ष देतात तिथपर्यंत ठिक आहे. पण नेतृत्व करू नये. कारण राजेंकडे नेतृत्व असताना त्यांना इतर समाजाचेही प्रश्न सोडवावे लागतील', असे मत सुरेश पाटील यांनी व्यक्त केले.