आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धार्मिक भावना दुखावल्याने उस्मानाबादेत दोन गटात राडा:मुघल सम्राट औरंगजेबाविषयी आक्षेपार्ह फेसबुक पोस्टवरून दोन गटात तुफान राडा, दगडफेकीत चार पोलीस कर्मचारी जखमी

उस्मानाबाद3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

फेसबुकवर औरंगजेबाविषयी पोस्ट टाकल्यावरून दोन गटात तुफान राडा झाला आहे. काल रात्री 10 च्या सुमारास उस्मानाबाद शहरातील विजय चौक येथे ही घटना घडली असून, मोठ्याप्रमाणात दगडफेक करत करण्यात आली आहे. त्यात पोलीस बंदोबस्तासाठी आलेले 4 पोलीस कर्मचारी देखील जखमी झाले आहे. त्यांच्यावर जवळच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहे. मुघल सम्राट औरंगजेब याविषयी आक्षेपार्ह पोस्ट केल्यानंतर हा वाद उफाळला आहे.

दोन तरुणांनी फेसबुक पोस्टवर प्रतिक्रिया दिली होती. त्यामुळे आमच्या धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यावरून मंगळवारी रात्री दोन गटात दगडफेक झाली आहे. पोलीसांना माहिती मिळताच, पोलीस उपविभागीय अधिकारी अंजुम शेख, स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक गजानन घाडगे, शहर पोलीस निरिक्षक सुरेश बुधवंत, तहसिलदार गणेश माळी यांनी घटनास्थळी धाव घेत तातडीने कारवाई केली आहे.

बातम्या आणखी आहेत...