आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा''आमचेच काँग्रेसचे नेते आम्हालाच मदत करीत नाही. आम्ही 'डीपीडीसी'बद्दल विचारले तर बाळासाहेब थोरात अजित पवारांकडे बोट दाखवतात. नेतेच असे करीत असतील तर आम्ही काय करायचे? आम्ही लाचार झालो आहोत. वरिष्ठ आमच्याकडे 200 टक्के दुर्लक्ष करीत आहेत. अधिवेशन संपले की सोनिया गांधी यांची दिल्लीत भेट घेणार असून त्यांच्याकडे तोंडी तक्रार करणार असल्याची माहिती काँग्रेसचे जालना विधानसभा मतदार संघाचे आमदार कैलास गोरंट्याल यांनी आज 'दिव्य मराठी'शी बोलताना दिली.
आमदार गोरंट्याल म्हणाले की, निधी वाटपात काँग्रेसला डावलले जाते. नियोजन समितीवरही काँग्रेसची वर्णी लागत नाही. तीन पक्षांच्या युतीचे सरकार आहे परंतू, त्यातही विसंगती आहेत. आम्ही काहीही सांगितले तर आमचे नेते बाळासाहेब थोरात अजित पवारांकडे जायचे सांगतात? ते भांडत नाहीत असेही ते म्हणाले.
एकटा माणुस म्हणून मी कुठे कुठे लढू
वरिष्ठांना केवळ मतदारांपुरताच वेळ आहे. ते हात टेकून असतात. एकटा माणुस म्हणून मी कुठे - कुठे लढू?, एकटा काय करू? वरिष्ठ नेते मदत करीत नाही पण मला तर काँग्रेस म्हणून लढावे लागणारच ना.
बरेच आमदार नाराज आहेत पण ते बोलत नाहीत मी फटकन बोलतो. नेते काँग्रेसच्या इतर पदाधिकारी, कार्यकर्त्यांना न्याय देत नाहीत. त्यामुळे मी अधिवेशन संपले की सोनिया गांधी यांची दिल्लीत भेट घेणार असून त्यांच्याकडे मी तोंडी तक्रार करणार असल्याचेही ते म्हणाले.
भाजपची ऑफर...गोरंट्याल उत्तरले..
सार्वजिक कार्यक्रमात भागवत कराड यांनी भाजमध्ये येण्याची ऑफर दिली यावर ते म्हणाले की, असे काही नसते ते गमतीत सांगतात. मी काँग्रेसमध्येच आहे, काँग्रेसमध्येच राहणार. ते मस्करीत बोलले आहेत. मी कधीही भाजपला मदत केली नाही. पण विकासाच्या कामासाठी आम्ही मदत करतो. राजकारणात एकमेकांना विकासकामांसाठी मदत करणे हे लोकप्रतिनिधीचे काम आहे. मैत्रीपुर्ण आमचे काम आहे.
येणाऱ्या नगरपालिका निवडणूकीत हातात कमळ असेल या माझ्या वक्तव्याचा विपर्यास घेतला गेला. आगामी नगर पालिकांत जास्तीत जास्त काँग्रेसनंतर भाजप , राष्ट्रवादी व अपक्ष नगरसेवक निवडून येतील. पाचवा पक्ष जालन्यात दिसणार नाही असेही ते म्हणाले.
तर..मी रावसाहेब दानवेंची स्तुती करणार!
मी रावसाहेब दानवेंची स्तुती करतो म्हणजे त्या व्यक्तीने कामे केली. रेल्वे, बुलेट ट्रेन, रस्ते याचे कामही ते करीत आहेत. माझ्या जिल्ह्यासाठी ते काम करीत असतील तर त्यांची मी स्तुती करणार. दानवेंची राजकीय नाही पण विकासासाठी मदत मिळाली असेही ते म्हणाले.
अर्जून खोतकरांवर अप्रत्यक्ष टीका
राजेश टोपे आणि आम्ही एकत्र बसणार पण शिवसेना सोबत राहणार नाही. आम्ही त्यांना सोबत घेणार नाही. अर्थातच नगरपालिकेत शिवसेनेसोबत युती राहणार नाही. कारण त्यांचा जिल्ह्याचा नेता 'डॅमेज' झाला आहे. त्यांचे काम बोगस झाले असून त्यांचे उमेदवार जिथे उभे राहतील तेथे ते पडतील. शिवसेनेसोबत युती केली तर आम्हीही भुईसपाट होऊ कारण त्यांची छबी डॅमेज आहे. आम्ही आमचे 17 पिल्लर आहोत, त्यामुळे भाजपची गरजही पडणार नाही. राष्ट्रवादी व आमची एकत्र युती राहील एवढे मात्र नक्की असेही ते म्हणाले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.