आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नांदेड:शिवस्मारकाच्या कामासाठी उत्तर देण्याची आमची तयारी, मंत्री अशोकराव चव्हाण यांची नांदेडमध्ये माहिती

नांदेड2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक न्यायालयाच्या स्थगितीमुळे बंद आहे. त्यात आम्ही सरकारच्या वतीने जोरदार उत्तर देण्याची तयारी करत आहोत, असे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत सांगितले.

जिल्हा काँग्रेसच्या वतीने नांदेड येथे मंगळवारी सकाळी ११ वाजता कुसुम सभागृहात “व्यर्थ ना हो बलिदान, चलो बचाए संविधान’ हा कार्यक्रम तर दुपारी २ वाजता भक्ती लॉन्स येथे नांदेड, हिंगोली, लातूर, परभणी या चार जिल्ह्यांची आढावा बैठक आयोजित केली आहे. या कार्यक्रमांना महाराष्ट्राचे प्रभारी एच.के.पाटील, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार, अमित देशमुख, वर्षाताई गायकवाड, खा. सुरेश धानोरकर, शिवाजीराव मोघे, चंद्रकांत हंडोरे, बसवराज पाटील आदी नेते प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत. या अनुषंगाने मंत्री चव्हाण यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की, छत्रपती संभाजी राजे यांनी नांदेडमध्ये रान पेटवून देईल, असे वक्तव्य केले होते. त्याबद्दल मला काही सांगायचे नाही.

राजेंच्या कार्यक्रमात भाजपप्रणीत गर्दी होती. ही गर्दी कोणी आणली, कोणी गाड्या बोलावल्या याची सर्व माहिती माझ्याकडे आहे. ५० टक्के मर्यादेत आरक्षण देताना केंद्र शासनाने फक्त ५० टक्क्यांची मर्यादा संपवून तो अधिकार राज्यांना दिला नाही. ज्यांना लोकसभेत आणि राज्यसभेत बोलायचे असते ते गल्लीत बोलतात. मराठा आरक्षण मिळावे, ही काँग्रेस पक्षाची व माझी भूमिका आहेच, आता ते काम आव्हानात्मक झाले आहे. ५ मिनिटांत लोकसभेत आणि राज्यसभेत अध्यादेश काढून आजहीही परिस्थिती बदलता येते. पण, ते केंद्र शासनाच्या हातात आहे, असे पालकमंत्री चव्हाण यांनी सांगितले. मराठा आरक्षणाबद्दल संपूर्ण इमानदारीने काम करतो आहे. कोण काय बोलतात त्यासाठी मला काही देणे-घेणे नाही, असेही चव्हाण म्हणाले.

राजकीय पक्षांच्या आश्रयाशिवाय गुंडगिरी शक्यच नाही : चव्हाण
नांदेड शहरात आणि जिल्ह्यात गोळीबाराच्या घटना अनेक घडल्या. त्यात राजकीय पाठबळ असल्याशिवाय असे प्रकार घडत नाहीत. माझ्या पक्षात असा कोणताही माफिया नसल्याचा उल्लेख चव्हाण यांनी केला. अशा घटनांकडे पोलिसांनी अधिक लक्ष देण्याची गरज आहे, असेही ते म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...