आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

परभणी:मुरुंबा येथे 800 वर कोंबड्या मृत्युमुखी, नमुने तपासणीसाठी पुणे प्रयोगशाळेकडे

परभणी3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

देशातील अनेक राज्यांत बर्ड फ्लूचे संकट घाेंगावत असताना परभणी तालुक्यातील मुरुंबा शिवारात गेल्या दोन दिवसांत ८०० वर कोंबड्या मृत्युमुखी पडल्या आहेत. मुरुंबा गावशिवारापासून ५ किमी अंतरात कोंबड्यांची खरेदी, विक्री, वाहतूक, बाजार आणि जत्रा, प्रदर्शन आयोजित करण्यास जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी शुक्रवारी बंदी घातली. दरम्यान, जिल्हा व तालुका पशुसंवर्धन विभागाने याची दखल घेतली असून सर्वेक्षणाचे काम सुरू केले. मृत कोंबड्याचे नमुने पुणे येथील प्रयोगशाळेकडे पाठवण्यात आले आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणात कोंबड्या मृत पावल्याने एकच खळबळ उडाली आहे.

दरम्यान, मुरुंबा येथील एका कुक्कुटपालन केंद्रात ८०० कोंबड्या मृत पावल्या आहेत. जिल्हा पशुसंवर्धन विभागाच्या पथकाने त्या ठिकाणी जाऊन पाहणी केली आहे. मृत कोंबड्याचे नमुने पुणे येथील प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी आल्याची माहिती परभणीचे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी अशोक लोणे यांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...