आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Oxford And Many Other Reputed Universities Canceled Their Exams, But Our Governor's Knowledge Is Great Sharad Pawar

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

परीक्षेच राजकारण:ऑक्सफोर्ड आणि इतर अनेक ख्यातनाम विद्यापीठांनी आपल्या परीक्षा रद्द केल्या, पण आपल्या राज्यपालांचे ज्ञान मोठे- शरद पवार

राडगड9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी महाराष्ट्रात आलेल्या निसर्ग चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर नुकसानग्रस्त कोकण भागाचा दौरा केला. दोन दिवस पवारांनी नुकसानग्रस्त भागांची पाहणी केली. यादरम्यान माध्यमांशी संवाद साधताना विविध मुद्द्यावर प्रकास टाकला. राज्यातील अंतिम वर्षाच्या परीक्षांवरुन राज्यपाल विरुद्ध राज्य सरकार असे चित्र असताना, पवारांनी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्यावर निशाणा साधला. 

यावेळी पवार म्हणाले की, 'राज्यात अनेक शिक्षण संस्था आहेत. कोरोनामुळे अनेक परीक्षा रद्द झाल्या आहेत. आयआयटीने परीक्षा न घेण्याचा निर्णय घेतला आहे. जगातील ख्यातनाम अशा ऑक्सफोर्ड विद्यापीठ, अन्य चांगल्या विद्यापीठांनी परीक्षा न घेण्याचा निर्णय घेतला. महाराष्ट्र शासनाने घेतलेला निर्णय आणि त्यात अगदीच चुकीचे कोणी केले आहे होत असे नाही. मात्र राज्यपालांचे ज्ञान अर्थात आपल्यापेक्षा मोठे असेल', असा घणाघात शरद पवारांनी केला. 

देवेंद्र फडणवीसांनाही टोला

यावेळी शरद पवारांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या कोकण दौऱ्यावरही निशाना साधला.  पवार म्हणाले की, 'मी बारामतीसारख्या दुष्काळी भागातून येतो. देवेंद्र फडणवीस विदर्भातून येतात. समुद्राशी काहीही संबंध नाही. त्यामुळे ते येत आहेत तर चांगलच आहे. प्रत्येकाला ही परिस्थिती समजेल आणि ज्ञानात भर पडेल.'

दरम्यान, राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी राज्य सरकारच्या परीक्षेऐवजी श्रेणीच्या निर्णयाला प्रलंबित ठेवत विद्यापीठ कायद्याप्रमाणे निर्णय होईल, अशी भूमिका घेतली आहे. याबाबत राज्यपालांनी अंतिम वर्षाच्या परीक्षा विद्यापीठ कायद्याप्रमाणे घेण्यात येतील, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निर्णय कळवले आहे.

बातम्या आणखी आहेत...