आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

कोरोना व्हॅक्सीन:मुंबई आणि पुण्यातील 5 हजार लोकांवर होणार ट्रायल, ऑक्सफोर्ड यूनिव्हर्सिटी आणि सीरम संस्था एकत्रितपणे तयार करत आहेत कोरोना लस

मुंबई14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सीरम इंस्टिट्यूट ऑफ इंडियाने आशा व्यक्त केली आहे की, सर्वकाही ठीक झाल्यास पुढील वर्षापर्यंत व्हॅक्सीन लॉन्च होईल
Advertisement
Advertisement

ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीला कोरोना व्हॅक्सीनच्या निकालांमध्ये समाधानकारक परिणाम मिळाल्यानंतर आता यूकेमध्येही मोठ्या प्रमाणात ट्रायल सुरू केले आहेत. ऑक्सफोर्ड यूनिव्हर्सिटी आणि सीरम इंस्टिट्यूटच्या व्हॅक्सीनचे ट्रायल सर्वात आधी पुणे आणि मुंबईतील हॉटस्पॉट झोनमध्ये राहणाऱ्या पाच हजार लोकांवर होणारआहे. व्हॅक्सीनचे स्थानिक उत्पादन सीरम इंस्टिट्यूट ऑफ इंडियाने आशा व्यक्त केली आहे की, सर्वकाही ठीक राहिल्यास पुढील वर्षापर्यंत व्हॅक्सीन लॉन्च होईल.

पुणे आणि मुंबईमध्ये सर्वात जास्त हॉटस्पॉट

पुण्यात बुधवारपर्यंत 59,000 पेक्षा जास्त, तर मुंबईत 1 लाखांपेक्षा जास्त कोरोना रुग्ण झाले आहेत. राज्यभरातील एकूण कोरोना रुग्णांपैकी अर्धे रुग्ण या दोन शहरात आहेत. सीरम इंस्टीट्यूटचे सीईओ अदर पूनावाला यांनी सांगितले की, मुंबई आणि पुण्यातील अनेक ठिकाणांना आम्ही व्हॅक्सीनच्या ट्रायलसाठी शॉर्टलिस्ट केले आहे. या शहरात सर्वात जास्त हॉटस्पॉट आहेत.

दर महिन्याला 7 कोटी डोस तयार करण्याची योजना 

पूनावाला म्हणाले की, सुरुवातीच्या टप्प्यात व्हॅक्सीन सुरक्षित असल्याचे सिद्ध झाले आहे. यामुळे देशात होणाऱ्या ट्रायलमध्ये वृद्ध आणि आरोग्य कर्मचाऱ्यांनाही सामील केले जाईल. व्हॅक्सीन तयार करण्यासाठी कंपनी विशेष परवानगी घेणार आहे आणि दर महिन्याला 7 कोटी डोस तयार करण्याची योजना आहे. तसेच, पूनावाला यांनी सांगितल्याप्रमाणे या डोसची किंमत 1 हजार रुपयांपर्यंत असू शकते.

क्लीनिकल ट्रायलमध्ये चांगला परिणाम आला

सोमवारी क्लीनिकल ट्रायलचे परिणाम जारी करत ऑक्सफोर्ड यूनिव्हर्सिटीने चांगले परिणाम आल्याचे सांगितले होते. सोमवारी मेडिकल जर्नल द लैंसेटमध्ये छापलेल्या रिपोर्टनुसार, व्हॅक्सीन पूर्णपणे सुरक्षित आहे. AZD1222 नावाच्या व्हॅक्सीनला दिल्याने चांगला इम्यून रिस्पांस मिळत आहे. 

Advertisement
0