आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Hingoli । Oxygen Bank । Oxygen Bank Taking Shape In Hingoli District Collector's Office Premises, Planting 21,000 Trees In 1.25 Acres; Initiative Of District Administration And Forest Department

हिंगोलीत ऑक्सीजन बँक:हिंगोलीत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात आकार घेतेय ऑक्सीजन बँक, 1.25 एकरमध्ये 21 हजार झाडांची लागवड; जिल्हा प्रशासन अन वन विभागाचा पुढाकार

हिंगोली11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिंगोलीत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात जिल्हा प्रशासन व वन विभागाच्या पुढाकारातून ऑक्सीजन बँक आकार घेत असून या ठिकाणी असलेल्या सव्वा एकर जागेत मियाँवाकी पध्दतीने विविध प्रजातींची तब्बल 21000 झाडे लावण्यात आली आहेत.

या झाडांच्या संगोपणासाठी तुषारसिंचन पध्दतीने पाणी दिले जात आहे. हिंगोलीत वृक्षलागवड योजनेत जास्तीत जास्त मोकळ्या जागांमधून वृक्ष लागवड करण्यासाठी सर्वच यंत्रणांनी सुरवात केली आहे. जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या विविध विभागांनी गाव, तालुका पातळीवर झाडांची लागवड करून त्याचे संगोपनही सुरु केले आहे.

दरम्यान, हिंगोलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात असलेल्या पडिक जागेवर मियाँवाकी पध्दतीने वृक्षलागवड करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी यांनी घेतला. त्यानुसार वन विभागाचे प्रभारी विभागीय वन अधिकारी विश्वनाथ टाक यांना वृक्षलागवडीची संकल्पना सांगितल्यानंतर महसुल व वन विभागाने तयारी सुरु केली.

यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात असलेल्या सव्वा एकर जागेची साफसफाई करून त्या ठिकाणी 21 हजार रोपांची लागवड केली. यामध्ये पिंपळ, वड, आंबा, चिंच, आवळा, करंज, जांभूळ आदी झाडांसोबतच पारिजातक व इतर फुलांची रोपेही लावण्यात आली आहेत. या ठिकाणी रोपांचे संगोपन करण्यासाठी तुषार सिंचन पध्दतीने पाणी दिले जात असून सध्या हा परिसर चांगलाच बहरला आहे. पुढील काही दिवसांतच हि परिसर हिरवाईने नटणार आहे.

दरम्यान, कमी जागेत लावण्यात आलेल्या या झाडांमुळे परिसरात ऑक्सीजनचे प्रमाण वाढणार असून एक प्रकारे ऑक्सीजन बँकच तयार होत असल्याचे सांगण्यात आले आहे. प्रशासनाच्या पुढाकारातून साकरल्या जात असलेल्या ऑक्सीजन बँकेचा परिसराला फायदाच होणार आहे.

परिसरातील तापमानात घट होणार
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकात सुर्यवंशी यांच्या संकल्पनेतून ही ऑक्सीजन बँक तयार होत आहे. या घटदाट वनामुळे परिसरातील तापमानात मोठी घट होणार आहे. या शिवाय ऑक्सीजनचे प्रमाणही वाढणार आहे. तसेच देशी वृक्षांचे संगोपनही यातून होणार आहे.- विश्वनाथ टाक, प्रभारी विभागीय वन अधिकारी

बातम्या आणखी आहेत...