आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराप्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कार जाहीर करण्यात आली आहेत. पश्चिम बंगालचे डॉ. दिलीप महालानबीस यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. ओआरएसच्या शोधाबद्दल त्यांना हा सन्मान जाहीर झाला. त्यांच्याशिवाय सपा नेते दिवंगत मुलायम सिंह यादव, तबलावादक झाकीर हुसेन, बालकृष्ण दोशी आणि श्रीनिवास वर्धन यांना पद्मविभूषणने सन्मानित करण्यात आले आहे. तर औरंगाबादेतील डाॅ. प्रभाकर मांडे यांनाही पद्मश्री पुरस्कार प्राप्त झाला आहे.
सुधा मूर्तींसह 9 सेलिब्रिटींना पद्मभूषण
कुमार मंगलम बिर्ला आणि सुधा मूर्ती यांच्यासह 9 सेलिब्रिटींना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. याशिवाय 91 जणांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
डॉ. दिलीप महालानबीस यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार जाहीर झाला. ओआरएसच्या शोधाबद्दल त्यांना हा सन्मान देण्यात आला. 16 ऑक्टोबर 2022 रोजी वयाच्या 87 व्या वर्षी त्यांचे निधन झाले.
रतन चंद्राकर यांना अंदमानच्या जरावा जमातींमधील गोवर या आजारावर केलेल्या कामासाठी पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. हिरा बाई लोबी यांना गुजरातमधील सिद्धी जमातींमधील मुलांच्या शिक्षणावरील कार्यासाठी पद्मश्री आणि जबलपूरचे डॉ. मुनीश्वर चंदर दावर यांना सन्मानित करण्यात आले आहे. डॉ. मुनीश्वर 50 वर्षांपासून वंचितांवर अत्यंत स्वस्तात उपचार करत आहेत.
औरंगाबादेतील डाॅ. प्रभाकर मांडेंना पद्मश्री पुरस्कार
औरंगाबादेतील डाॅ. प्रभाकर मांडे यांनाही पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. साहित्य आणि शिक्षण क्षेत्रातील योगदानाबद्दल हा पुरस्कार जाहीर झाला आहे. डाॅ. मांडे विद्यापीठीय पातळीवर आणि अभ्यासकांच्या पातळीवर लोकसाहित्याचा अभ्यास करणारे संशोधक आहेत. त्यांचे शिक्षण मिलिंद महाविद्यालय,औरंगाबाद झाले आहे.
लोकसाहित्य संशोधन मंडळाची स्थापना
डाॅ. मांडे यांनी लोकसाहित्य संशोधन मंडळाची स्थापना केली. ही संस्था महाराष्ट्रात लोकसाहित्याच्या अभ्यासकांना एकत्र आणते. त्यांनी महाराष्ट्रात आणि गोव्यात लोकसाहित्यविषयक परिषदा आयोजित केल्या. या परिषदांमधून अभ्यासकांना डॉ. अशोक रानडे, डॉ. गंगाधर मोरजे, डॉ. तारा परांजपे, डॉ. तारा भवाळकर, डॉ. दुर्गा भागवत, डॉ. रा. चिं. ढेरे, इ. विद्वानांचे मार्गदर्शन लाभले. मांडे यांच्या मार्गदर्शनाखाली 12 हून अधिक विद्यार्थी पीएच.डी. व सुमारे तेवढेच एम.फिल झाले.
पुस्तके
आदिवासी मूलत: हिंदूच, आदिवासींचे धर्मांतर : एक समस्या, उपेक्षित पर्व, कलगीतुऱ्याची आध्यात्मिक शाहिरी (१९६१ साली लिहिलेल्या पीएच.डीच्या प्रबंधाचे ग्रंथरूप), गावगाडा, जातगाव आणि जातगावाची पंचायत गावगाड्याबाहेर, चतुरदास विरचित एकादश स्कंध भाषाटीका (हिंदी, संपादित) दलित साहित्याचे निराळेपण, पंडित दामोदर रचित महानुभावीय पद्मपुराण (संपादित), बिल्वदल, बुडालेला गाव, भारतीय आदिवासींचे स्थान भारतीय आदिवासी : विकासाच्या समस्या मांग आणि त्यांचे मागते. सन 2010 आणि 2018 मध्ये झालेल्या अखिल भारतीय मराठी लोककला संमेलनांचे डाॅ. मांडे अध्यक्ष होते.
यांना पद्मविभूषण पुरस्कार
यांना पद्मभूषण पुरस्कार
यांना पद्मश्री पुरस्कार
ORS म्हणजे काय?
ओरल रीहायड्रेशन सॉल्ट (ओआरएस) हे ऊर्जा वाढवणारे सूत्र आहेत जे शरीराला हरवलेले इलेक्ट्रोलाइट्स परत मिळवण्यास मदत करतात. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) नुसार, ORS मध्ये 4 मूलभूत घटक असतात जे 1 लिटर स्वच्छ पिण्याच्या पाण्यात विरघळले जाणे आवश्यक आहे. हे सोडियम क्लोराईड (मीठ), ट्रायसोडियम सायट्रेट, डिहायड्रेट, पोटॅशियम क्लोराईड आणि ग्लुकोज म्हणजेच साखर आहेत. एक लिटर पाण्यात सहा चमचे साखर आणि अर्धा चमचा मीठ विरघळवून ते घरी बनवता येते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.