आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Palkhi Ceremony Of Sant Namdev Maharaj Will Go To Pandharpur By Helicopter If Government Gives Permission, Initiative Of MLA Tanhaji Mutkule

हिंगोली:शासनाने परवानगी दिल्यास संत नामदेव महाराजांचा पालखी सोहळा हेलीकॉप्टरने पंढरपूरला जाणार, आमदार तान्हाजी मुटकुळे यांचा पुढाकार

हिंगोली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
Advertisement
Advertisement

संत नामदेव महाराजांचे जन्मस्थळ असलेल्या नर्सी नामदेव येथून संत नामदेव महाराजांची पालखी आषाढीवारी निमित्त पंढरपूर येथे नेण्यासाठी हेलीकॉप्टरची परवानगी देण्याची मागणी आमदार तान्हाजी मुटकुळे यांच्यासह भाविकांनी केली आहे. आता शासनाने परवानगी दिल्यास नर्सी नामदेव येथील पालखी सोहळा हेलीकॉप्टरने पंढरपूर येथे जाणार आहे.

संत नामदेव महाराजांचे जन्मस्थळ असलेल्या नर्सी नामदेव येथून मागील २४ वर्षापासून पायी दिंडी सोहळा आषाढी एकादशी निमित्त पंढरपूर येथे जातो. या पालखी सोहळ्यात शेकडो भाविकांचा सहभाग असतो. या पालखी सोहळ्याचे हिंगोली त्यानंतर आंबाजोगाई या ठिकाणी गोल रिंगण देखील होते. पालखी सोहळ्याचे ठिकठिकाणी स्वागत केले जाते.

यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभुमीवर शासनाने पालखी सोहळा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे संत नामदेव महाराजांच्या पालखी सोहळ्याची वारी चुकण्याची शक्यता आहे. मात्र पंढरपूर वारी होण्यासाठी आमदार तान्हाजी मुटकुळे, बाजार समितीचे माजी सभापती रामेश्‍वर शिंदे पाटील केसापूरकर यांच्यासह भाविकांनी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्याकडे पत्र दिले आहे. या शिवाय आमदार मुटकुळे यांनी शासनाकडेही पत्र पाठविले आहे. संत नामदेव महाराजांच्या पालखी सोहळ्यासाठी शासनाने हेलीकॉप्टरची परवानगी द्यावी. या वारीमध्ये शासनाचे दिलेल्या सुचनेनुसारच भाविक सहभागी होतील. यावर्षी वारी रद्द होऊ नये यासाठी हेलीकॉप्टरची परवानगी द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे. दरम्यान, शासनाने आता हेलीकॉप्टरची परवानगी दिल्यास संत नामदेव महाराजांचा पालखी सोहळा यावर्षी हेलीकॉप्टरने  पंढरपूर येथे नेला जाणार आहे.

शासनाकडे पाठपुरावा करणार : आमदार तान्हाजी मुटकुळे

संत नामदेव महाराजांच्या पालखी सोहळ्यासाठी शासनाकडे हेेलीकॉप्टरची परवानगी मागितली आहे. शासनाने परवानगी दिल्यास तातडीने पालखी सोहळ्याची तयारी सुरु केली जाईल. कुठल्याही परिस्थितीत पालखी सोहळा होण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणार आहे.

Advertisement
0