आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मंगळवेढा:पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीत 66.15 टक्के मतदान

मंगळवेढा9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कोरोना नियमांचे पालन करत मतदान प्रक्रिया पार पडावी म्हणून स्थानिक प्रशासन प्रयत्न करत आहे.

पंढरपूर मंगळवेढा विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी सरासरी ६६.१५ टक्के मतदान झाले. १ लाख ७८ हजार १९० पुरुष व १ लाख ६२ हजार ६९४ असे ३ लाख ४० हजार ८८९ मतदारांपैकी २ लाख २५ हजार ४८५ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये १ लाख २० हजार ८८४ पुरुष तर १ लाख ४ हजार ८०१ मतदारांचा समावेश आहे. सर्वत्र शांततेत मतदान झाल्याची माहिती पंढरपूरचे प्रांत तथा निवडणूक निर्णय अधिकारी गजानन गुरव यानी दिली.

उमेदवारांची संख्या जास्त असली तरी लढत मात्र प्रामुख्याने राष्ट्रवादीचे भगीरथ भालके आणि भाजपचे समाधान आवताडे या दोन उमेदवारांत झाल्याचे चित्र दिसले. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर मनात भीती असल्याने मतदार स्वतः काळजी घेऊन मास्क व सॅनिटायझरचा वापर करीत शारीरिक अंतर ठेवून मतदानासाठी आल्याचे चित्र सर्वत्र पहावयास मिळाले. कडक उन्हामुळे मतदानाच्या टक्केवारीत घट झाली असली तरी सर्वत्र मतदान चुरशीने आणि शांततेत झाले. तालुक्यातील मोठी ग्रामपंचायत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भोसे गावातील चार कोरोना रुग्णांचा मृत्यू झाल्याने गावावर शोककळा पसरली होती, त्यामुळे या गावात मतदान झाले नसल्याचे सांगण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...