आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Pandharpur By Election Result 2021 Live : Updates NCP Candidate Bhagirath Bhalke BJP Candidate Samadhan Avtade Win?

पंढरपूर पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीला धक्का:भाजपच्या समाधान औताडेंकडून राष्ट्रवादीच्या भगीरथ भालकेंचा 3716 मतांनी पराभव

पंढरपूरएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंढरपुरात जमावबंदीचा आदेश दिले आहे

राष्ट्रवादीचे दिवंगत आमदार भारत भालके यांच्या निधनाने रिक्त झालेल्या पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणुकीचा रविवारी (2 मे) निकाल जाहीर झाला. ही निवडणूक राष्ट्रवादीसह भाजपनेही प्रतिष्ठेची केली होती. या निवडणुकीत भाजपचा राष्ट्रवादीवर विजय झाला आहे. भाजपचे उमेदवार समाधान औताडे यांनी भारत भालके यांचे पुत्र आणि राष्ट्रवादीचे उमेदवार भगीरथ भालके यांचा 3716 मतांनी पराभव केलाय.

सुरुवातीच्या फेऱ्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे भगीरथ भालके हे आघाडीवर होते. मात्र काही फेऱ्यांनंतर भाजपचे उमेदवार यांनी समाधान औताडे यांनी आपली आघाडी शेवटपर्यंत कायम ठेवली आणि दणदणीत विजय मिळवला आहे.

निकालादरम्यान जमावबंदीचे आदेश
दरम्यान आज निवडणुकींच्या निकालानंतर विजयी मिरवणूक निघण्याची शक्यता असते म्हणून खबरदारी म्हणून प्रशासनाने पहिलेच जमावबंदीचे आदेश जारी केले होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंढरपुरात जमावबंदीचा आदेश दिले. यासोबतच घराबाहेर फिरुन मतमोजणीचा निकाल ऐकता येणार नाही. निकाल घरात बसून आकाशवाणी तसेच voter helpline app या माध्यमातून जाणून घेण्याचे आवाहन करण्यात आले होते.

बातम्या आणखी आहेत...