आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Pandharpur Manglvedha Byelection News And Updates, Ruling Mahavikas Aghadi Government Will Fall Chandrakant Patil

सरकार पडण्याचे भाकीत:सत्ताधारी महाविकास आघाडी सरकार पडणार, हे आठवीतला मुलगाही सांगेल- चंद्रकांत पाटील

पंढरपूर9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सरकारने जाहीर केलेले पॅकेज फसवे आहे

राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडी सरकार पडेल, अशी भाकीत भाजप नेते करत असतात. यातच आता चंद्रकांत पाटील यांनी परत एकदा हेच भाकीत केले आहे. पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणुकीतील भाजपचे उमेदवार समाधान आवताडे यांच्या प्रचारार्थ ते पुंढरपुरात आले होते. यावेळी ते म्हणाले की, महाविकास आघाडी सरकार पडेल, हे आठवीतला मुलगाही सांगू शकतो.

पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीचा दोन्ही पक्ष जोरदार प्रचार करताना दिसत आहे. राष्ट्रवादीकडून दिवंगत भारत भालके यांचे पुत्र भगीरथ भालके यांना उमेदवारी देण्यात आली आहे, तर भाजपकडून समाधान आवताडे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यांच्या प्रचारासाठी चंद्रकांत पाटील पंढरपुरात आले होते. यावेळी पाटलांनी आघाडी सरकारवर जोरदार टीका केली. ते म्हणाले की, 'राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असून, सरकारकडे काहीच नियोजन नाही. सरकारमध्ये विल पॉवर कमी आहे, त्यामुळे कोणताही निर्णय घेतला जात नाही. आठवीतला मुलगाही राजकीय विश्लेषण करू शकेल आणि सांगेल की हे सरकार लवकरच पडणार आहे, असे पाटील म्हणाले.

चंद्रकांत पाटील पुढे म्हणाले की, 'राज्यात कोरोना रुग्णांसाठी ऑक्सिजनची कमतरता आहे. पण सरकारने आरोग्य यंत्रणेबाबत काहीच प्लानिंग केली नाही. आम्ही आमदारांच्या विकास निधीतले चार कोटी काढून दोन कोटी रुपये सरकारला द्यायला हवे असे म्हटलो. तेही केले नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल जाहीर केलेले पॅकेज फसवे आहे. या सरकारने दीड हजार रुपये मदत देऊन गोरगरिबांची चेष्टा केली आहे. दीड हजारात कुटुंबाचा खर्च चालतो का? लॉकडाऊनला आमचा विरोध नाही, हे आम्ही आधीपासून सांगतोय. कोरोनाची साखळी तोडलीच पाहिजे. परंतु, गडी, हमाल, माथाडी कामगार, व्यापारी हा वर्ग मोठा आहे. त्यांचा या पॅकेजमध्ये विचार करण्यात आलेला नाही, असेही पाटील म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...