आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Pandharpur News And Updates; Discussion Of Parth Pawar's Name On The Seat Vacated By The Demise Of Bharat Bhalke

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पंढरपूर पोटनिवडणूक:भारत भालके यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेवर पार्थ पवारांच्या नावाची चर्चा, जयंत पाटील म्हणतात...

पंढरपूर4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • पंढरपूरचे आमदार भरत भालके यांचे 27 नोव्हेंबरला निधन झाले

राष्ट्रवादी काँग्रेसचे फायर ब्रँड नेते अशी ओळख असलेल्या दिवंगत आमदार भारत भालके यांच्या अकाली निधनानंतर रिक्त झालेल्या पंढरपूर मतदारसंघाच्या जागेवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. परंतू, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी या वृत्तांचे खंडन केले आहे. पार्थ पवारांना उमेदवारी देण्याबाबत कोणतीही चर्चा झाली नाही, असे पाटील यांनी स्पष्ट केले आहे.

पंढरपूरच्या पोटनिवडणुकीमध्ये पार्थ पवारांना उमेदवारी दिल्यावर राष्ट्रवादीचा विजय नक्की होईल, असा विश्वास राष्ट्रवादीचे नेते अमरजीत पाटील यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, माध्यमांना प्रतिक्रिया देताना जयंत पाटील म्हणाले की, 'मी राष्ट्रवादी पक्षाचा प्रदेशाध्यक्ष आहे. पार्थ पवार यांना उमेदवारी देण्याबाबत अशी कोणतीही चर्चा माझ्या स्तरावर झाली नाही,' असे पाटील यांनी स्पष्ट केले आहे.

बातम्या आणखी आहेत...