आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

प्रतिक्रीया:'भाजपच्या सर्व टीमचे अभिनंदन...', भाजपच्या कार्यकारिणीवर पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

भारतीय जनता पक्षाची महाराष्ट्रातील कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ही कार्यकारिणी जाहीर केली. या कार्यकारिणीत भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना स्थान देण्यात आले नाही. त्यांना केंद्रात स्थान दिले जाईल, असे चंद्रकांत पाटलांनी सांगितले. त्यावर आता पंकजा मुंडे यांनी प्रतिक्रीया दिली आहे.

अवघ्या राज्याचे लक्ष लागलेल्या भाजपची महाराष्ट्र कार्यकारिणी जाहीर झाली. पंकजा मुंडेंना प्रदेश कार्यकारिणीत स्थान मिळाले नाही. यावर पंकजांनी ट्वीटरवरुन प्रतिक्रीया देताना म्हटले की, 'भाजपच्या नवीन टीमचे अभिनंदन. माझ्या विषयीची भूमिका जाहीर केल्याबद्दल प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे आभार,' असे ट्विट पंकजा मुंडेंनी केले आहे. 

पंकजा मुंडेंना केंद्रात स्थान दिले जाईल- चंद्रकांत पाटील

 'पंकजाताईंना केंद्रात कार्यकारिणीत चांगली जबाबदारी मिळणआर आहे, त्या कोअर कमिटीच्या सदस्या शंभर टक्के असतील, केंद्राची जबाबदारी आणि महाराष्ट्रातील कोअर कमिटी अशी त्यांची भूमिका असेल', यासोबतच खासदार प्रीतम मुंडे आणि खासदार रक्षा खडसे या दोघींनाही राज्य कार्यकारिणीत जबाबदारी देण्यात आली आहे. यावर स्पष्टीकरण देताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, या दोनवेळा खासदार आहेत त्यांच्या कामामुळे त्यांना जबाबदारी देण्यात आली आहे. पंकजाताई किंवा एकनाथ खडसे यांच्या नाराजीमुळे यांना जबाबदारी दिली असं नाही.

भाजपची कार्यकारिणी जाहीर

प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ही कार्यकारिणी जाहीर केली. या प्रमुख कार्यकारणीत  12 प्रदेश उपाध्यक्ष, 12 सेक्रेटरी, 6 जनरल सेक्रेटरी आणि 1 कोषाध्यक्ष आहेत. असे चंद्रकांत पाटलांनी घोषित केले.

चंद्रकांत पाटील म्हणाले की, या कार्यकारणीत याशिवाय 7 प्रमुख मोर्चे असतात. त्याचे अध्यक्षही आम्ही घोषित करत असतो. या व्यतिरिक्त 18 प्रकोष्ठ म्हणजे वेगवेगळ्या विषयांचे प्रमुख घोषित करत आहोत. यासोतबच प्रदेशाचे कार्यालय, मीडिया, सोशल मीडिया या सर्वांचे प्रमुख आम्ही घोषित करत असणार असल्याचंही ते म्हणाले.

कार्यकारणीची यादी 

  • महामंत्री

सुजित सिंह ठाकूर, चंद्रशेखर बावनकुळे, देवयानी फरांदे, रवींद्र चव्हाण, श्रीकांत भारतीय, विजय पुराणिक

  • उपाध्यक्ष

संजय कुटे, माधव भंडारी, माजी मंत्री राम शिंदे, चित्रा वाघ, जयकुमार रावल, आमदार प्रसाद लाड, माजी आमदार सुरेश हळवणकर, खासदार प्रीतम मुंडे, माधवी नाईक, खासदार कपिल पाटील, खासदार भारती पवार, जयप्रकाश ठाकुर असे 12 उपाध्यक्ष असतील

  • सेक्रेटरी 

माजी आमदार प्रमोद जठार, अर्चना तेहटकर, नागनाथ निरोवदे, राजेंद्र बकाने, संजय पुराम, दयानंद चोरगे, अॅड धर्मपाल मेश्राम, खासदार रक्षा खडसे, संदीप लेले, स्नेहलता कोल्हे, इंद्रिस मुलतानी, अमित गोरखे,

  • मुख्य प्रतोद आणि प्रतोद 

मुख्य प्रतोद आशिष शेलार आणि प्रतोद - माधुरी मिसाळ

0