आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पंकजा मुंडे भडकल्या:'अंगार-भंगार घोषणा काय देताय? जेवढ्या मोठ्या उंचीची मी, तेवढी लायकी ठेवा स्वत:ची', कार्यकर्त्यांच्या घोषणांमुळं पंकजा मुंडेंचा राग अनावर

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नुकतेच केंद्रीय मंत्री झालेले भागवत कराड यांनी जनतेशी संवाद साधण्यासाठी आजपासून जनआशीर्वाद यात्रेची सुरुवात केली आहे. कराड यांची जन आशीर्वाद यात्रा गोपीथनाथ गडावरुन सुरु झाली.

मात्र, ही यात्रा सुरु होण्याआधीच परळीत वेगळाच राडा झाल्याचं समोर आलं. भागवत कराड परळीत दाखल होताच मुंडे समर्थकांनी पंकजा आणि प्रितम मुंडे यांच्या समर्थनार्थ घोषणा दिल्या. या घोणाबाजीवरुन पंकजा मुंडे चांगल्याच संतापलेल्या पाहायला मिळाल्या.

'अंगार.. भंगार' या घोषणेमुळं पंकजा मुंडे संतापल्या. अशा घोषणा देणाऱ्यांना त्या मूर्ख म्हणाल्या. 'मी तुम्हाला असं वागायला शिकवलंय का? मूर्ख कुठले? मुंडे साहेब अमर रहे... या घोषणा मी रोखू शकत नाही. तुमचं त्यांच्यावर प्रेम आहे. पण अंगार, भंगार हे काय लावलं? हा दुसऱ्या पक्षाचा कार्यक्रम आहे का?,' असा सवाल त्यांनी कार्यकर्त्यांना केला. 'असं वागणं मला शोभत नाही. जेवढ्या मोठ्या उंचीची मी आहे, तेवढी लायकी ठेवा स्वत:ची. नाहीतर मला भेटायला येऊ नका,' अशा शब्दात पंकजा मुंडे यांनी कार्यकर्त्यांना सुनावलं. असं म्हणत पंकजा मुंडे संतापूर गाडीच्या दिशेने निघून गेल्या.

बातम्या आणखी आहेत...