आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भेट:पंकजा मुंडे यांनी घेतली राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट; शेतक-यांना दिलासा, नोकरभरती बाबत केली चर्चा

मुंबई9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी राजभवनात जाऊन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची आज सदिच्छा भेट घेतली व विविध विषयांवर चर्चा केली तसेच त्यांना दिवाळीच्या शुभेच्छाही दिल्या.

पंकजा मुंडे यांनी यासंदर्भात ट्विट करून राज्यपाल कोश्यारी यांच्या भेटीची माहिती दिली. राज्यात नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतक-यांच्या पिकांचे फार मोठे नुकसान झाले होते. पंकजा मुंडे यांनी स्वतः शेतक-यांच्या बांधावर जाऊन अतिवृष्टीची पाहणी केली होती, याबाबत त्यांनी राज्यपालांना माहिती दिली. राज्यातील कोरोनाची परिस्थिती, अतिवृष्टीतील शेतक-यांना दिलासा तसेच नोकरभरती या विषयावर त्यांनी राज्यपाल महोदयांनी चर्चा केली तसेच त्यांना दिवाळीच्या शुभेच्छाही दिल्या.

बातम्या आणखी आहेत...