आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Pankaja Munde Press Conferance । The Co operative Sector State In Trouble Government Should Give A Package To Save The Sugar Industry Pankaja Mude

दिल्लीत पंकजा मुंडेची पत्रकार परिषद:राज्यातील सहकार क्षेत्र अडचणीत असून शेतकरी संकटात, सरकारने साखर उद्योग वाचवण्यासाठी पॅकेज द्यावे- पंकजा मुडे

नवी दिल्ली3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

देशातील काही राज्यात विधानसभा निवडणुकी जवळ येऊन ठेपल्या आहे. त्यापार्श्वभुमीवर भाजपचे कब्बर कसण्यास सुरुवात केली आहे. त्यापार्श्वभुमीवर राज्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे दिल्लीच्या दौऱ्यावर आहे. सहकार क्षेत्र आज अडचणीत आहे, देशातील राज्यातील शेतकरी संकटात आहे, त्यामुळे आजची देवेंद्र फडणवीस आणि अमित शहा यांची भेट महत्त्वाची ठरणार असल्याचे, वक्तव्य पंकजा मुंडे यांनी पत्रकार परिषदेत केले.

'देशातील पाच राज्यात विधानसभा निवडणुक होणार आहे. त्यावर भाजपची जोरदार तयारी सुरु असून, सकारात्मक विषयांवर चर्चा सुरु आहे. मी राष्ट्रीय सचिव म्हणून सांगते की, महागाईवर तोडगा निघेल' असे मुंडे म्हणाल्या.

ओबीसी आरक्षण
पुढे ओबीसींच्या आरक्षणाबद्दल मुंडे म्हणाल्या की, 'ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण रद्द झाल्याने समाजात प्रचंड संताप आहे. राज्याने दिलेले आरक्षण 50 टक्क्यांच्या वर होते. त्यावर आम्ही राजकीय, सामाजिक भुमिकेतून बोललो आहे' असे मुंडे म्हणाल्या.

सहकार क्षेत्र डबघाईला
राज्यातले सहकार क्षेत्र डबघाईला आला आहे. शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. नुकसानाची भुमिका घेऊन शेतकऱ्यांच्या भल्यासाठी तात्काळ निर्णय घेतला पाहिजे. राज्यातील सहकार क्षेत्र हे अडचणीत सापडले आहे. फडणवीस निवडणुकांसाठी नव्हे तर राज्यातील कारखाने सुरु राहिले पाहिजे. साखर उद्योग जगवण्यासाठी सरकारने पॅकेज दिले पाहिजे.

साखर उद्येगावरील कर्जाचा डोंगर कमी करतांना करकपात झाली पाहिजे. यासाठी अमित शहांची भेट घेत आहे. केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर केला जातो असे अनेक विधान राज्यातील सत्ताधारी करत आहे, मात्र हे मला हे वक्तव्य योग्य वाटत नाही., असे पंकजा मुंडे पत्रकार परिषदेत म्हणाल्या.

बातम्या आणखी आहेत...