आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परमबीर सिंह प्रकरण:महाराष्ट्राच्या पोलिस महासंचालकांनी चौकशीस दिला नकार; परमबीर यांनी त्यांच्यावर दबाव टाकल्याचा लावला आरोप

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • CBI करू शकते पांडे यांची चौकशी

महाराष्ट्राचे पोलिस महासंचालक(DGP) संजय पांडे यांनी मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांच्याविरोधात चौकशी करण्यास नकार दिला आहे. सिंह यांच्याविरोधात दोन आरोपांची चौकशी गृह विभागाने संजय पांडे यांच्याकडे सोपवली होती. पण, पांडेंविरोधात परमबीर यांनी उच्च न्यायालयात काही पुरावे सादर केले होते. त्यात दावा करण्यात आला की, पांडे यांनी सरकारसोबत समझोता केला होता. तसेच माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात लावलेले आरोप परत घेण्यासाठी दबाव टाकला होता.

परमबीर सिंह यांनी या प्रकरणाचा तपास करणाऱ्या CBI ला पत्र लिहून दावा केला की, पांडे यांनी त्यांना म्हटले की, त्यांनी तक्रार परत घेतल्यावर त्यांच्याविरोधात सुरू असलेली चौकशी रद्द करण्यात येईल. या आरोपानंतर पांडे यांनी परमबीर सिंह यांच्या प्रकरणाची चौकशी करण्यास नकार दिला.

CBI करू शकते पांडे यांची चौकशी
परमबीर सिंह यांच्या आरोपानंतर CBI या प्रकरणात पांडे यांची चौकशी करू शकते. पुरावा म्हणून, पांडे आणि सिंह यांच्यामध्ये झालेल्या व्हॉट्सअॅ चॅट आणि रेकॉर्डिंग सादर केली जाऊ शकते.

या दोन प्रकरणांचा तपास पांडे यांना सोपवण्यात आला होता

IPS परमबीर सिंह यांच्याविरोधात पांडे यांना 1 एप्रिलला तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुखांनी तपास सोपवला होता. यात सिंह यांनी ऑल इंडिया सर्विसच्या नियमांना मोडले का, याबाबत तपास करायचा होता. परमबीर सिंह यांच्याविरोधात दुसऱ्या प्रकरणातील तपास विद्यमान गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी 20 एप्रिलला पांडेंकडेच दिली होता. या एका पोलिस अधिकाऱ्याकडून सिंह यांच्याविरोधात लावलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांची चौकशी करायची होती.

बातम्या आणखी आहेत...