आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

परभणी कोरोना:जिल्हाबंदी असताना चोरून केला प्रवेश, कोरोनाबाधित युवकासह नातेवाईकांविरूद्ध गुन्हा दाखल; पोलिस यंत्रणा कठोर भूमिकेत

परभणीएका वर्षापूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
परभणीतील बाजारपेठेत शुकशुकाट - Divya Marathi
परभणीतील बाजारपेठेत शुकशुकाट
  • परजिल्ह्यातील लोकांना आश्रय दिल्यास गुन्हा दाखल, जिल्हा पोलिस अधिक्षकांचे निर्देश
  • कोरोनाबाधितावर गुन्हा दाखल होण्यातील बहुधा पहिलीच वेळ

कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता जिल्हा प्रशासनाने जिल्ह्याच्या सर्व सीमा बंद केल्यानंतर सुद्धा चोरीच्या मार्गाने जिल्ह्यात प्रवेश केल्याबद्दल त्या कोरोनाबाधित युवकाविरूद्थ व त्यास आश्रय दिल्याबद्दल त्याच्या नातेवाईकांविरूद्ध येथील नवा मोंढा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, कोरोना बाबत कोरोनाबाधित युवका विरूद्ध गुन्हा दाखल होण्याचा हा पहिला प्रकार असावा, असा अंदाज आहे. 

संपूर्ण जिल्ह्यात लॉकडाऊनच्या पहिल्या टप्प्यात एक सुध्दा कोरोना बाधित रुग्ण आढळला नाही. प्रशासनाने त्या विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता जिल्ह्याच्या सीमेवर 15 ठिकाणी नाकाबंदी पॉईट लावून सुध्दा चोरीच्या मार्गाने या युवकाने पूणे येथून परभणीत जिल्ह्यात मोटारसायकलद्वारे येवून जिल्ह्यात प्रवेश केला. एमआयडीसी परिसरात तो बहिणीकडे वास्तव्यास राहिला. त्यामुळे त्याच्या विरूध्द व त्यास आश्रय दिलेल्या नातेवाईकाविरूध्द भारतीय दंड विधान कलम 188,269,270 व 51 आपत्ती व्यवस्थापन कायद्यान्वये येथील नवा मोंढा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

परजिल्ह्यातील लोकांना आश्रय दिल्यास गुन्हा दाखल

पुणे, मुंबई, औरंगाबाद येथून चोरून, लपून येणारा नातेवाईक व इतर लोकांनी आश्रय देवून ती माहिती लपून ठेवल्यास त्यांच्या विरूध्द सुध्दा गुन्हे दाखल केले जातील, असा  इशारा दिला आहे. बाहेरून जिल्ह्यातून येणा-या लोकांना कोणी आश्रय देवू नये, तसे स्पष्ट निर्देश जिल्हा पोलिस अधिक्षकांनी दिले आहेत.

बातम्या आणखी आहेत...