आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Parbhani Covid 19 Update: 18 People With Indirect Contact With First Corona Positive Patient Are Home Quarantined

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

परभणी अपडेट:'त्या' महिलेच्या संपर्कात आलेले 18 जण होम क्वारंटाइन, परभणीतील पहिल्या कोरोनाग्रस्ताची बहीण

परभणीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • युवका व्यतिरिक्त अद्याप कुणालाही कोरोनाची लागण झालेली नाही

जिल्ह्यात पहिला कोरोनाग्रस्त सापडल्यानंतर परिसरातील 18 जणांना होम क्वारंटाइन करण्यात आले आहे. परभणीतील औद्योगिक वसाहतीमध्ये एका युवकाला कोरोनाची लागण झाल्याचे गुरुवारी समोर आले होते. त्याच कोरोनाग्रस्ताची बहीण घरोघरी धुणी-भांडीचे काम करत असते. रुग्णालयात दाखल होण्यापूर्वी कोरोनाबाधित युवक याच बहिणीकडे थांबला होता. आता तिच्या संपर्कात आलेल्या 18 जणांना होम क्वारंटाइन करण्यात आल्याची माहिती शुक्रवारी जारी करण्यात आली आहे.

मूळचा हिंगोली जिल्ह्यातील असलेला हा युवक परभणीतील औद्योगिक वसाहतीमध्ये आपल्या बहिणीच्या घरी राहण्यासाठी आला होता. याच दरम्यान त्याला कोरोनाची लक्षणे दिसून आली. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तसेच चाचणीसाठी स्वॅबचे नमुणे घेण्यात आले. या युवकाचा गुरुवारी रिपोर्ट आला त्यामध्ये त्याला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. ज्या बहिणीच्या घरी हा युवक थांबला होता, ती धुणीभांडीचे काम करत असते. त्यामुळे, ती ज्या-ज्या घरांमध्ये काम करण्यासाठी जाते त्या 5 कुटुंबांची यादी करण्यात आली. या कुटुंबांतील एकूणच 18 जणांना आता होम क्वारंटाइन करण्यात आले आहे. दरम्यान, यापैकी कुणालाही किंवा त्या युवकाचा बहिणीला कोरोनाची लागण झाल्याचे अद्याप समोर आलेले नाही.

बातम्या आणखी आहेत...