आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Parbhani Covid 19 Update: Parbhani Corona, Qaurantine, Corona Negative Reports Latest News And Updates On Parbhani Corona

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

परभणी अपडेट:पहिल्या कोरोनाग्रस्ताच्या संपर्कात आलेल्या बहिणीसह 9 जणांचे अहवाल निगेटिव्ह; क्वारंटाइन करण्यात आलेल्यांना मोठा दिलासा

परभणीएका वर्षापूर्वीलेखक: मंगेश शेवाळकर
  • कॉपी लिंक
  • 3 किलोमीटरचा परिसर, त्यातील 29 वसाहती, 4 हजार 87 घरे कंटेनमेंट झोनमध्ये

जिल्ह्यातील पहिल्या कोरोनाग्रस्ताच्या संपर्कात आलेल्या सर्व 9 संशयित रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. यात त्या रुग्णाच्या बहिणीचा देखील समावेश आहे. परभणीत 16 एप्रिल रोजी एका तरुणाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर जिल्हा ग्रीन झोनमधून ऑरेंज झोनमध्ये टाकण्यात आला. तसेच त्याच्या संपर्कात आलेल्या संशयितांच्या स्वॅबचे नमुणे घेण्यात आले होते. हेच नमुणे औरंगाबादला पाठवल्यानंतर शुक्रवारी रात्री साडे अकराच्या सुमारास त्यांचे अहवाल आल्यानंतर परभणीकरांनी सुटकेचा श्वास घेतला.

होम क्वारंटाइन करण्यात आलेल्यांना मोठा दिलासा

विशेष म्हणजे, पुण्याहून परभणीला आलेला युवक ज्या बहिणीकडे थांबला होता, ती इतरांच्या घरात धुणी भांडीचे काम करते. अशात ती ज्यांच्या घरात जाते त्या सर्वांना प्रशासनाने होम क्वारंटाइन केले होते. प्रशासनाने ती घरकाम करत असलेल्या 5 कुटुंबांची माहिती काढली होती. तसेच या कुटुंबांतील 18 जणांना होम क्वारंटाइन केले होते. आता मात्र, त्या महिलेचा अहवाल निगेटिव्ह आल्याने ही त्या सर्व कुटुंबियांसाठी मोठा दिलासा देणारी बातमी ठरली आहे.

  कोरोनाग्रस्त युवकाची प्रकृती सध्या स्थिर असून तो उपचाराला प्रतिसाद देत आहे. परभणी जिल्ह्यात आतापर्यंत 496 संशयितांची नोंद झाली आहे. त्यात 407 जणांचे स्वॅब घेण्यात आले होते. त्यातील 340 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. उर्वरीत संशयितांचे अहवाल प्रलंबित होते. त्यातील 9 जणांचे रात्री अहवाल निगेटिव्ह आले आहेत. दरम्यान, युवकाच्या बहिणीचे निवासस्थान असलेला एमआयडीसी परिसर 16 एप्रिलपासून सील केला आहे. त्याचबरोबर या परिसरापासून तीन किलोमीटरचा परिसर तसेच त्यातील 29 वसाहती आणि 4 हजार 87 घर यांचा कंटेनमेंट झोनमध्ये समावेश करण्यात आला आहे.

बातम्या आणखी आहेत...