आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापरभणी जिल्ह्यातील पाथरी पोलिसांनी गस्ती दरम्यान एका चार चाकीचा संशय आल्याने सिनेस्टाइलने पाठलाग करून आरोपींना ताब्यात घेत, त्यांच्याकडून तब्बल 11 लाख 30 हजार किमतीचा 2 क्विंटल 26 किलो गांजा जप्त केला आहे.
सदरील कारवाई पाथरी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक वसंत चव्हाण, सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रवीण सोमवंशी, पोलिस उपनिरीक्षक चिरंजीवी दलालवाड, पोलिस कर्मचारी रासवे, सोडगीर यांच्या पथकाने केली आहे. या घटनेबाबत अधिक माहिती अशी की, पाथरी पोलिस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी हे गुरुवार 9 सप्टेंबर रोजी रात्री गस्त आणि नका बंदी करत होते. दरम्यान शुक्रवार 10 सप्टेंबर रोजी पहाटेच्या सुमारास त्यांना एक चारचाकी वेगाने सेलू रस्त्याकडे वळताना दिसली. यावेळी पोलिसांना चारचाकी अधिक वेगाने पळत असल्याने संशय आला. त्यामुळे लागलीच पाथरी पोलिसांनी त्या चारचाकीचा पाठलाग सुरू केला.
पोलिसांनी पाथरी पासून बोरगव्हाणपर्यंत तब्बल 8 ते 9 किमी त्या चारचाकीचा पाठलाग केला. परंतु खराब रस्ता असतांनाही आरोपी सुसाट वेगाणे चारचाकी पळवत होते. यातच आरोपी बोरगव्हाणच्या दिशेने निघाले असता, पोलिसांनी ग्रामस्थांच्या मदतीने दोन आरोपींना ताब्यात घेतले. तर एक आरोपी फरार झाला आहे. त्यानंतर पोलिसांनी सदरील चारचाकीची झडती घेतली असता, त्यात 2 क्विंटल 26 किलो गांजा आढळून आला असून त्याची अंदाजे किंमत 11 लाख 30 हजार एवढी आहे. या कारवाई पोलिसांनी चारचाकी सह बीड येथील मारुती रामराव बोलेगावे आणि एका महिला आरोपीस ताब्यात घेतले आहे. आता याबाबत पाथरी पोलिस अधिक तपास करत आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.