आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परभणी:परभणी जिल्ह्यात सर्वदूर पावसाची हजेरी, 24 तासांत सरासरी 27.7 मिमी पावसाची नोंद

परभणी4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • परभणी जिल्ह्यात रविवारी ही सकाळ पासून रात्री उशिरापर्यंत कुठे मध्यम तर कुठे जोरदार पाऊस झाला

परभणी जिल्ह्यात सोमवार दि. 27 सप्टेंबर रोजी सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. दरम्यान सायंकाळच्या सुमारास परभणी शहरासह जिल्ह्यात अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाने हजेरी लावली. अचानक आलेल्या या पावसाने नागरिकांची तारांबळ उडाली.

परभणी जिल्ह्यात रविवारी देखील सकाळ पासून रात्री उशिरापर्यंत कुठे मध्यम तर कुठे जोरदार पाऊस झाला. जिल्ह्यात सोमवारी (दि.27) सकाळी आठ पर्यंतच्या 24 तासांत सरासरी 27.7 मिमी पावसाची नोंद झाली आहे. आतापर्यंत जिल्ह्यात 1 जून पासून एकूण 1041.8 मिमी पावसाची नोंद झाली आहे. सध्या जिल्ह्यातील जलप्रकल्पात मोठ्या प्रमाणात पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. तर नद्या, नाले आणि ओढे ओसंडून वाहत आहेत. शिवाय येलदरी धरण आणि निम्न दुधना प्रकल्प 100 टक्के भरले आहेत.

सोमवारी येलदारी धरणातून 11 हजार 139 क्यूसेगने पूर्णा नदी पात्रात आणि निम्न दुधना प्रकल्पातून 12 हजार 996 क्यूसेने दुधना नदी पात्रात पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. एकूणच पूर्णा, दुधना आणि गोदावरी या नद्या दुथडी भरून वाहत आहेत. तर या नदी काठच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. मात्र सततच्या पावसामुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. अतिवृष्टीने जिल्ह्यातील 1 लाख 60 हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. आता मूग, उडीद या पिकांन पाठोपाठ खरिपातील सोयाबीन, कापूस आदी पिकांचे ही सततच्या पावसाने नुकसान होऊन हातातोंडाशी आलेला घास जातो की काय अशी चिंता शेतकरी व्यक्त करत आहेत.

दरम्यान परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील विस्तार कृषी विद्यावेत्ता विभागाचे समन्वयक डॉ. गजानन गडदे यांनी शेतकऱ्यांनी पिकांमध्ये पाणी जास्त काळ साचून राहणार नाही, याची काळजी घ्यावी आणि शक्य असेल तिथे चर काढून साचलेले पाणी शेताबाहेर काढावे. पावसाची उघडीप पाहूनच शेतकऱ्यांनी पिकांवर फवारणी करावी. शिवाय पीक कापणीची घाई करू नये. ज्यांनी कापणी केली असेल त्यांनी पिके झाकून ठेवावीत. जेव्हा उघडीप असेल, तेव्हा झाकलेली पिके परत उघडी कारवाईत, जेणे करून त्याला बुरशी लागणार नाही. शिवाय सध्या वादळीवारा, विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी स्वतः सह आपल्या जनावरांची काळजी घ्यावी. विनाकारण घरा बाहेर पडूनये आणि जनावरांना गोठ्यातच ठेवावे. असे आव्हान केले आहे.

बातम्या आणखी आहेत...