आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परभणी:सोशल मीडियावर बदनामी करणाऱ्या तरुणावर गुन्हा

परभणी2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • विश्वकर्मावंशीय समाज संघटनेच्या वतीनेही याचा निषेध नोंदवण्यात आला आहे.

सोशल मीडिया ग्रुपवर शिक्षकाच्या कुटुंबीयांची बदनामी करणाऱ्या तरुणावर अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नागोराव काशीनाथ पांचाळ (४६) यांनी या प्रकरणी परभणीतील नवा मोंढा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यावरून अविनाश चंद्रकांत सांगळेविरुद्ध फिर्याद दिली होती.

नागोराव पांचाळ हे परभणीजवळील कात्नेश्वर येथे शिक्षक आहेत. विश्वकर्मा वंशीय समाज संघटनेचे प्रदेशाध्यक्षही आहेत. त्यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, अविनाश हा विनाकारण अपशब्दांत बोलत असतो. नागोराव यांनी अविनाशचे वडील चंद्रकांत यांना मुलाच्या कृत्याबद्दल माहिती दिली. त्यानंतर अविनाशने नागोराव यांना फोन करून धमकी दिली व सोशल मीडिया ग्रुपवर नागोराव व त्यांच्या कुटुंबीयांबद्दल अाक्षेपार्ह भाषेत बदनामीकारक मजकूर लिहिला. या प्रकरणात पोलिसांनी अविनाशविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे. विश्वकर्मावंशीय समाज संघटनेच्या वतीनेही याचा निषेध नोंदवण्यात आला आहे.

बातम्या आणखी आहेत...