आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापरभणी शहरात सार्वजनिक ठिकाणी विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांवर आज जिल्ह्याधिकारी आंचल गोयल यांनी कारवाई केली आहे.
जिल्ह्याधिकारी आंचल गोयल यांनी आज स्वतः शहरातील गांधी पार्क, शिवाजी चौक जनता मार्केट, कच्छी बाजार आणि जुना मोंढा परिसर भागात विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांवर आणि दुकानादारांवर दंडात्मक कारवाई केली. तसेच ज्या दुकानादारांनी अजूनपर्यंत पहिले ही लसीकरण करून घेतले नाही त्यांची दुकाने बंद करण्याची ही यावेळी जिल्ह्याधिकारी यांनी कारवाई केली.
..अन्यथा 5 हजार दंड
यापुढे जे दुकानदार लस न घेता आपली दुकाने उघडतील त्यांना ५ हजार रुपये दंड लावला जाईल. तसेच ज्या दुकानातील मालक आणि कर्मचारी यांनी दोन्ही लस घेतल्या असल्यास त्याचे प्रमाणपत्र दुकानाबाहेर लावूनच आपली दुकाने उघडी करावी, असे ही निर्देश जिल्ह्याधिकारी गोयल यांनी यावेळी व्यापाऱ्यांना दिले.
यावेळी जिल्ह्याधिकारी गोयल यांनी नागरिक आणि व्यापारी यांच्याशी संवाद साधला असता ७० ते ८० टक्के जनतेने अजूनही लसीकरण करून घेतले नसल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे त्यांनी कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेची शक्यता पाहता मास्क वापरणे, शारीरिक अंतर राखणे आणि लसीकरण करून घेणे किती महत्वाचे आहे, याबाबत मार्गदर्शन जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी बाहेर पडतांना मास्कचा वापर करावा, शारीरिक अंतर राखावे आणि लसीकरणाच्या करून घ्यावे, असे आवाहन यावेळी जिल्ह्याधिकारी गोयल यांनी केले.
७७ जणांवर कारवाई
यावेळी महानगर पालिकेकडून विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांवर तसेच दुकानादारांवर २०० रुपये दंडाची कारवाई करण्यात आली. यानुसार ७७ जणांवर कारवाई करत १५ हजार ४०० रुपये आणि एक दुकानावर कारवाई करत १० हजार दंड करण्यात आला. यावेळी पालिका आयुक्त रोहिदास पवार, उपायुक्त रणजित पाटील, मुख्य स्वछता निरीक्षक करण गायकवाड यांची उपस्थिती होती.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.