आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परभणी:भाविक भक्तांची दर्शनासाठी रीघ, तर मंदिरे उघडल्याने भक्तांमध्ये आनंदी वातावरण

परभणी19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • परभणी शहरात असलेले अष्टभुजा देवीचे मंदिर सकाळ पासून भक्तांसाठी खुले करण्यात आले आहे.

आज शारदीय नवरात्रौत्सवाला सुरवात झाली आहे. राज्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरल्याने घट स्थापनेच्या मुहूर्तावर गेल्या दीड वर्षांपासून बंद असलेली मंदिरे राज्य शासनाच्या आदेशानुसार भक्तांसाठी खुली करण्यात आली आहेत. परभणीत ही मंदिरे उघडण्यासाठी भाविक भक्तांनी जोरदार तयारी करत मंदिरे घडण्यात आली आहेत.

परभणी शहरात असलेले अष्टभुजा देवीचे मंदिर सकाळ पासून भक्तांसाठी खुले करण्यात आले आहे. घट स्थापनेच्या मुहूर्तावर भाविक भक्तांची पहाटे पासूनच दर्शनासाठी लगबग सुरू झाली होती. तर शहरातील व्यंकटेश नगर परिसरातील श्री व्यंकटेश मंदीर हे वारकरी भूषण हभप अच्युत महाराज दस्तापुरकर यांच्या शुभहस्ते डॉक्टर विवेक नावंदर, मंदिर समितीचे कार्याध्यक्ष संतोष असेगावकर, विश्वस्त किशोरजी रोपळेकर, भारत गुरु, दीपक गुरु, नगरसेवक चंदू शिंदे, नगरसेवक जैन, सेवेकरी बालाजी पांडे आदींसह भक्तांच्या उपस्थितीत दर्शनासाठी खुले करण्यात आले. त्यामुळे सकाळपासूनच दर्शनासाठी भाविकांची रीघ पाहायला मिळाली आहे. दीड वर्षांच्या प्रतिक्षेनंतर भाविकांना मंदीरात ‌जावून दर्शन मिळत असल्याने भाविकांमध्ये‌ आनंदाचे वातावरण आहे, आज पासून सर्वांसाठी मंदिर खुली करण्यात आल्याने मंगलमय‌ वातावरणात भाविकांनी मास्क, सॅनिटायझर यांचा वापर करत शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करून देवाच्या दर्शनाचा लाभ घेतायत. यावेळी भाविकांनी घट स्थापनेच्या मुहूर्तावर देवाचे मंदिरात जाऊन दर्शन घेता आल्याने आपल्या मनातील आनंद व्यक्त केला आहे. तर येणाऱ्या दसऱ्या निमित्त देवीने ज्या पद्धतीने असुरांचा नाश करून समस्त मानव जातीचे रक्षण केले होते. त्याच पद्धतीने परत एकदा कोरोना रुपी असुराचा नाश करून जगाला या संकटापासून मुक्त करावे अशी भावना भाविकांनी या निमीत्त व्यक्त केली आहे.

बातम्या आणखी आहेत...