आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परभणी:विद्यार्थी पॉझिटिव्ह आल्याने 8 दिवस शाळा बंद, पूर्णा तालुक्यातील गौर येथील घटना

परभणी17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सिन्नर, निफाड, येवल्यात होम क्वॉरंटाइनवर बंदी

परभणीच्या पूर्णा तालुक्यातील गौर येथील श्री सोमेश्वर विद्यालयातील एक विद्यार्थी रुग्ण कोरोनाबाधित आढळून आला आहे. त्यामुळे प्रशासनाने या शाळेचा परिसर ८ दिवसांसाठी प्रतिबंधित क्षेत्र घोषित केला आहे. पूर्णा येथील तहसीलदार पल्लवी टेमकर यांनी यासंबंधीचे काढले आहेत.

राज्यात ४ ऑक्टोबरपासून शाळा उघडल्या आहेत. दरम्यान, गौर येथील जवळपास ६९ विद्यार्थ्यांच्या तपासण्या करण्यात आल्या. यात सातवीतील एक विद्यार्थी पॉझिटिव्ह आला. यानंतर प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून ८ दिवस शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, विद्यार्थ्यांची योग्य पद्धतीने काळजी घेतली जात असून विद्यार्थ्यांना लक्षणे जाणवत असल्यास तपासणी करून घ्यावी, असे आवाहन परभणीचे उपशिक्षणाधिकारी विठ्ठल भुसारे यांनी केले.

सिन्नर, निफाड, येवल्यात होम क्वॉरंटाइनवर बंदी
नाशिक |
नगर जिल्ह्यात ६८ गावे लॉकडाऊन करावी लागली आहेत. लगतच्या नाशिकच्या सिन्नर, निफाड व येवला तालुक्यातही रुग्णसंख्या वाढत आहे. त्यामुळे या तालुक्यांत रुग्णांना होम क्वाॅरंटाइन ठेवता येणार नाही. प्रत्येक रुग्णाला कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला. सण उत्सवांमुळे गर्दी वाढत चालली असून बाजार समितीदेखील बंद ठेवू, असा इशारा पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिला.

बातम्या आणखी आहेत...