आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नुकसान भरपाई द्या:शेतकऱ्यांना सरसकट 50 हजार रुपये एकरी नुकसान भरपाई द्या, ओला दुष्काळ जाहीर करा आणि खरिपासाठी घेतलेले कर्ज माफ करा- रावसाहेब दानवे

परभणी17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

केंद्रीय रेल्वे राज्य मंत्री रावसाहेब दानवे हे परभणी जिल्हा दौऱ्यावर आले आहेत. दरम्यान त्यांनी दैठणा येथे अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची पाहणी करत शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे यांनी उस्मानाबाद येथे, पंचनामे कशाला करता, शेतकऱ्यांना 50 हजारांची मदत जाहीर करा, अशी मागणी त्यावेळी केली होती. आता नशिबाने उद्धव ठाकरे स्वतः मुख्यमंत्री आहेत, त्यामुळे त्यांनी पंचनामे न करता थेट शेतकऱ्यांना एकरी 50 हजार रुपये मदत जाहीर करावी अशी मागणी केली आहे.

शिवाय त्यांनी तीन टप्यात झालेल्या पावसाने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. पण पहिल्या टप्यात झालेल्या पावसाच्या नुकसानीची शासनाने दाखल घ्यायला पाहिजे होती ती घेतली नाही. पंचनामे करून मदत द्यायला पाहिजे होती, ती मिळाली नाही, आणि आता तिसऱ्या टप्यात खूप पाऊस झाला. त्यामुळे शेतकऱ्यांचा हाता तोंडाशी आलेला घास गेला आहे. आता जर वेळेवर सरकारने शेतकऱ्यांना मदत नाही केली, तर शेतकरी रब्बीची पेरणी करू शकणार नाहीत. एवढी वाईट आता मराठवाड्यातील शेतकऱ्यांची परिस्थिती आहे.

शेतकऱ्यांचे सगळंच नुकसान झाले आहे, त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांना सरसगट 50 हजार रुपये एकरी मदत दिली पाहिजे, शिवाय जी जमीन खरडून गेली आहे. त्याचे पंचनामे वेगळे करून शेतकऱ्यांना मदत दिली पाहिजे. असे म्हणत ज्यावेळेस देवेंद्र फडणवीस मुखयमंत्री होते, त्यावेळेस उद्धव ठाकरे हे उस्मानाबादच्या दौऱ्यावर आले असता त्यांनी पंचनामे कशाला करता, शेतकऱ्यांना सरसगट 50 हजार रुपये द्या असे म्हंटल होत. आता नशिबाने ते स्वतः मुख्यमंत्री आहेत, त्यांचेच शब्द त्यांना संगतो आहे. असं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना त्यांचा पूर्वीच्या भाषणाची आठवण करून देत, तुम्ही आता वाट बघू नाका, पंचनामे करू नका, शेतकऱ्यांना सरसगट 50 हजार रुपये एकरी नुकसान भरपाई दिली पाहिजे. ओला दुष्काळ जाहीर करा आणि खरिपासाठी घेतलेले कर्ज माफ करा अशी मागणी केली आहे.

बातम्या आणखी आहेत...