आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापरभणीच्या सेलू तालुक्यातील कुपटा सज्जाचे ग्रामसेवक निलेश अंबादास अंभोरे (वय 30) यांना परभणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने 2 हजार रूपयांची लाच घेताना मंगळवार 21 सप्टेंबर रोजी सेलू येथे रंगेहात पकडले आहे.
या प्रकरणी अधिक माहिती अशी की, यातील तक्रारदाराने कुपटा येथील प्रताप गुलाबराव सोळंके यांच्याकडून 12 जुलै रोजी गावातील मालमत्ता क्रमांक 432 ची मोकळी जागा 74 हजार रूपयास खरेदी केली. सदरील जागा नमुना क्र. 8 वर लावण्यासाठी ग्रामसेवक अंभोरे यांनी तक्रारदारकडे लाचेची मागणी केली होती. यानंतर तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे याबाबत तक्रार दिली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाबाबत पडताळणी करून सापळा लावला असता मंगळवारी आरोपी ग्रामसेवक निलेश अंभोरे यास पंचासमक्ष 2 हजाराची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले.
त्याच्याविरुद्ध सेलू पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया मंगळवारी रात्री उशिरापर्यंत सुरु होती. सदरील कार्यवाही लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उप अधिक्षक भरत हुंबे, पोलिस निरीक्षक स्वप्नाली धुतराज, पोलीस कर्मचारी हनुमंते, कटारे, मुक्तार,धबडगे, मुखीद, कुलकर्णी,ल कदम यांच्या पथकाने केली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.