आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गगन भरारी:परभणीच्या अल्पभूधारक शेतकऱ्याच्या पुत्राची यूपीएससी परीक्षेत गगन भरारी; मनात भीती न बाळगता प्रयत्न करत राहावेत- पुके

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

परभणी तालुक्यातील टाकळी (कु.) येथील अल्पभुधारक शेतकऱ्याचा मुलगा नितीन गंगाधरराव पुके (वय 27) यांनी प्रतिकुल परिस्थितीचा सामना करत नुकत्याच लागलेल्या युपीएससी परीक्षेच्या निकालात गगन भरारी घेत घवघवीत यश संपादन केले आहे.

नितिन पुके यांची वडील अल्पभुधारक शेतकरी असून त्यांना केवळ 1 ऐकरच शेती असल्याने उदरनिर्वाहसाठी शिवणकाम आणि होमगार्डची नोकरी करतात. तर नितीन यांना दुसरे दोन भाऊ आहेत. मोठा भाऊ डीएड पदविका धारक असून शेती करतात आणि दुसरा भाऊ परिवहन मंडळात जिंतूर आगारात वाहक पदावर कार्यरत आहेत. नितीन हे सर्वात लहान असून त्यांचे प्राथमिक शिक्षण टाकळी (कु.) येथील जिल्हा परिषद शाळेत झाले, पाचवी ते दहावीचे शिक्षण परभणी येथील बाल विद्यामंदीर शाळा येथे तर बारावीचे शिक्षण नांदेड येथे यंशवत महाविद्यालयात झाले. पुढे बारावीनंतर त्यांनी मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे शिक्षण मुंबई येथे 2016 मध्ये पूर्ण केले. त्यानंतर दोन वर्ष मुंबई येथे लोढा ग्रुपमध्ये नोकरी केली.

मात्र लहानपणापासून अधिकारी होण्याचे स्वप्न पाहिलेल्या नितीन यांनी 2018 मध्ये पुणे गाठत युपीएससीच्या अभ्यासाला सुरुवात केली. दरम्यान 2019 मध्ये युपीएससीची परीक्षा दिली असता त्यांना DANICS (सहाय्यक जिल्हाधिकारी) म्हणून दिल्ली येथे नियुक्ती मिळाली. पण उच्च पदस्थ सनदी अधिकारी बनण्याचे स्वप्न नितीन यांना स्वस्त बसू देत नव्हते. त्यामुळे त्यांनी परत जोमाने अभ्यासाला सुरवात करत 2020 मध्ये युपीएससी परीक्षा दिली. या परीक्षेचा निकाल नुकताच घोषित झाला असून त्यात नितीन यांना AIR-466 वी रँक मिळाली आहे. दरम्यान, अत्यंत हलाकीच्या परिस्थितीत नितीन यांनी मोठे यश संपादन केल्याचा आनंद टाकळी ग्रामस्थांनी व्यक्त केला.

तरुण मुलांनी न खचता प्रमाणिक अभ्यास करून भारतीय प्रशाकीय सेवेमध्ये रुजू व्हावे - नितीन गंगाधरराव पुके
अभ्यासात सातत्य ठेवत प्रामाणिक पणे अभ्यास केला. माझ्या घरच्यांचाही मला वेळोवेळी पाठिंबा मिळाला. त्यामुळे यशाला गवसणी घालता आली. आज भारताच्या उज्वल भविष्यासाठी तरुण मुलांची गरज आहे, त्यासाठी तरुण मुलांनी न खचता प्रमाणिक अभ्यास करावा, कसलीही मनात भीती न बाळगता आपले प्रयत्न करत राहावेत आणि या भारतीय प्रशाकीय सेवेमध्ये रुजू व्हावे.

बातम्या आणखी आहेत...