आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापरभणीच्या जिंतूर तालुक्यातील डोंगरतळा येथे शनिवार 25 सप्टेंबर रोजी गावालगत असणाऱ्या तलावाची अचानकपणे पाणी पातळी वाढल्याने तलावाचे पाणी ओव्हरफ्लो होऊन चक्क ग्रामस्थांच्या घरात शिरले. पण प्रशासनाच्या सतर्कतेमुळे पुढील अनर्थ टळला आहे. या घटनेत गावातील 20 ते 25 पेक्षा जास्त ग्रामस्थांच्या संसारोपयोगी साहित्याची मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
जिल्ह्यात मागील दोन तीन दिवसांपासून सर्व दूर कुठे रिमझिम तर कुठे जोरदार पाऊस होत आहे. दरम्यान जिंतूर तालुक्यातील डोंगरतळा शिवारात शनिवारी सकाळच्या सुमारास अतिवृष्टी झाली. यामुळे गावाजवळ असलेल्या लघुसिंचन विभागाचा सिंचन तलावात क्षमतेपेक्षा जास्त पाणी जमा झाल्यामुळे सांडव्यातून मोठ्या प्रमाणात पाणी वाहू लागले. पाण्याचा प्रवाह मोठ्या प्रमाणात असल्यामुळे तसेच डोंगरतळा गावचे दोन भाग असल्याने पाणी ओढ्यात न जाता सरळ गावात शिरू लागले. यामुळे गावातील जवळपास 20 ते 25 पेक्ष्या जास्त घरात पाणी शिरल्याने संसारोपयोगी साहित्याची नुकसान मोठ्या प्रमाणात झाली आहे. या घटनेबाबत तालुका प्रशासनाला कळाल्यानंतर तहसीलदार सखाराम मांडवगडे, नायब तहसीलदार परेश चौधरी, तलाठी नितीन बुड्डे, ग्रामसेविका भाग्यश्री बेले यांच्यासह प्रशासनाने तातडीने गावाला भेट दिली.
दरम्यान, वाढत्या पाण्याचा गावाला धोका होऊ नये म्हणून प्रशासनाने जेसीबीच्या साह्याने पाणी इतरत्र काढून दिले असून यामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करून नुकसानग्रस्त भागाचे तत्काळ पंचनामे करण्यात येणार आल्याची माहिती तहसीलदार सखाराम मांडवगडे यांनी दिली आहे. प्रशासनाने तत्परता दाखवत पाणी इतरत्र वळवल्याने मोठा अनर्थ टळला आहे. मात्र अचानक घडलेल्या या घटनेमुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तर नुकसानग्रस्त कुटुंबाची तात्पुरती निवाऱ्याची व्यवस्था प्रशासनाने केली असल्याची माहिती मिळाली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.