आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
गरजू आणि गरिबांच्या जेवणाची सोय व्हावी यासाठी परभणीत रोटी बँकचा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या रोटी बँकचे वैशिष्ट्य म्हणजे २४ तास कधीही गेले तरी सकस जेवणाचा आनंद गरजूंना घेता येत आहे. तीन प्रकारच्या भाज्या, भात, वरण व गरम चपात्या अशा शुद्ध शाकाहारी जेवणाचा दरदिवशी दीड हजारावर लोक फायदा घेत आहेत. परभणी मनपाचे सभागृह नेते सय्यद समी ऊर्फ माजू लाला यांनी त्यांच्या आईच्या स्मरणार्थ सज्जू लाला मित्रमंडळाच्या माध्यमातून “तय्यबा रोटी बँक’ हा उपक्रम सुरू केला आहे.
गोरगरीब, गरजूंना दोन वेळचे पोटभर जेवण मिळावे हा उद्देश समोर ठेवून माजू लाला यांनी १३ नोव्हेंबर २०२० पासून शहरात हा उपक्रम सुरू केला. रोटी बँकेमध्ये चपात्या बनवण्यासाठी दोन महिला आहेत. दरदिवशीच्या सकस जेवणाव्यतिरिक्त दर शुक्रवारी व रविवारी गोड पदार्थांचा आहारात समावेश केला जातो. या कार्यासाठी स्वतः सय्यद समी ऊर्फ माजू पुढाकार घेत आहेत. रेल्वेस्थानक, बसस्थानक परिसरासह शहरातील नागरिक, गरजू नागरिक या ठिकाणी जेवण्यासाठी येत आहेत. या सर्व कार्यासाठी माजू लाला, हाफिज चाऊस, इम्रान लाला, उमर चाऊस, सय्यद मुश्ताक, अब्दुल फय्युम व मित्रमंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते पुढाकार घेत आहेत.
कॉल करा, जागेवर मिळेल जेवण : रोटी बँकेच्या ठिकाणी येऊन भोजनाचा आस्वाद घेणे शक्य नसेल किंवा तेथे येणे अडचणीचे वाटत असल्यास ८८०६५२००००, ९९२१२८६१११ या मोबाइल क्रमांकावर संपर्क केल्यास संबंधितांना आहे त्या ठिकाणी जेवण पोहोचवले जाते.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.