आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ज्ञानमंदिरे सुरु:परभणीत उत्साहात शाळांना सुरवात; विद्यार्थ्यांचा उस्फुर्त प्रतिसाद तर शिक्षकांनी केले विद्यार्थ्यांचे स्वागत

परभणी16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मागील दिड वर्षांपासून बंद असलेल्या शाळांची घंटा आज परत एकदा वाजली आहे. परभणी जिल्ह्यात मोठ्या उत्साहात शाळेची सुरवात झाली आहे. आज जिल्ह्यातील शहरी भागात 8 वी ते 12 वी आणि ग्रामीण भागातील 5 वी ते 12 वी च्या एकूण 1848 शाळा सुरू होणार आहेत. यात शहरी भागात 521 तर ग्रामीण भागात 1327 शाळांचा समावेश आहे.

सकाळपासूनच शाळेत जाण्यासाठी विद्यार्थ्यांची लगबग सुरू झाली होती. तर शाळेत ही शिक्षकांनी मोठ्या उत्साहात कोरोनाचे नियम पाळत गुलाब पुष्प देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत केले आहे. या वेळी विद्यार्थ्यांना मास्क बंधनकारक करण्यात आले, शिवाय सोशल डिस्टनसिंग, सॅनिटायझेशन, थर्मल गन आणि ऑक्सिमिटर यांच्याद्वारे विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात आली. तर वर्ग खोलीत एका बाकावर एक विद्यार्थी झिकझॅक पद्धतीने विद्यार्थ्यांची बसण्याची व्यवस्था केली आहे. यावेळी विद्यार्थ्यांनी ही मोठ्या उत्साहात शाळेत हजेरी लावली आहे. त्यामुळे परत एकदा शाळेचा परिसर चिमुकल्यांच्या उपस्थितीने फुलून गेला होता. यावेळी शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यात आनंदाचे आणि प्रसन्नतेचा वातावरण पाहायला मिळाले. आता परत शाळा ऑफलाईन पद्धतीने सुरू झाल्यामुळे जिल्ह्यातील 5 वि ते 12 वी च्या ग्रामीण भागातील 1 लाख 37 हजार 94 विद्यार्थ्यांना आणि 8 वी ते 12 वी च्या शहरी भागातील 1 लाख 28 हजार 30 विद्यार्थ्यांना प्रत्येक्ष शाळेत जाऊन शिक्षण घेता येणार आहे.

या प्रसंगी शाळा सुरू झाल्याने आज माझ्या सर्व शिक्षकांना आणि मैत्रिणींना प्रत्यक्ष भेटता आलं, त्यामुळे खूप आनंद झाला आहे. ऑनलाईन शिकतांना नेटवर्कची अडचण किंवा एखादी गोष्ट नाही समजली तर दुसऱ्या दिवशीच्या क्लासची वाट पहावी लागत असे, पण आता शाळा सुरू झाल्याने आता आमच्या अडचणी आम्हला वर्गातच थेट शिक्षकांना विचारता येतील. शिवाय आज शाळते आल्यावर आमचे सर्व शिक्षकांनी स्वागत केलं. त्यामुळे खूप आनंद वाटत असल्याचे इयत्ता 10 वित शिकणाऱ्या ऋतुजा पोते या विद्यार्थिनीने सांगितले आहे. तर शासनाने शाळा सुरू करण्याचा निर्णय घातल्याने आम्हला खूप आनंद झाला आहे. शाळा बंद असतांना ऑनलाईन शिक्षणात मुलांना अनेक अडचणींचा सामना करावा लागू लागला. पण आता शाळा प्रत्यक्ष सुरू झाल्याने ज्ञानदानाचे कार्य प्रभावी पणे करता येणार आहे. शिवाय सर्व विद्यार्थ्यांच्या समस्या सुटणार आहेत. असे मत गांधी विद्यालय शाळेचे मुख्याध्यापक बी. एच. बालटकर यांनी भावना व्यक्त केली आहे.

बातम्या आणखी आहेत...